पण ही सवय अतिशय चुकीची आहे. फळं चिरून ठेवणं आणि ती नंतर काहीवेळाने खाणं चुकीचं आहे. याने आपलं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या लहानशा सवयीचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. उन्हाळ्यातील उच्च तापमान आणि आर्द्रता हे फळांना अजिबात चालत नाहीत. यामुळे फळं लवकर खराब होऊ शकतात.
साल काढल्यानंतर फळ बाहेरील वातावरणाच्या संपर्कात येते. यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य कमी होते आणि फळांवर जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरणही बनू शकते. कापलेली फळं फ्रिजमध्ये दीर्घकाळासाठी किंवा उन्हाळ्यात अनेक दिवस साठवून ठेवणं चुकीचं आहे. न्यूज18 शी बोलताना, नोएडा येथील 'डाएट मंदिरा क्लिनिक'च्या संस्थापक आणि आहारतज्ञ कामिनी सिन्हा यांनी अधिक माहिती दिली आहे.
advertisement
आहारतज्ञ कामिनी सिन्हा यांच्यामते, 'आपण फळ कापल्याबरोबर त्यातील एन्झाइम्स हवेतील ऑक्सिजनशी प्रतिक्रिया देऊ लागतात. या प्रक्रियेला ऑक्सिडेशन म्हणतात. जसे पण सफरचंद किंवा केळी कापल्याबरोबर ते लगेच तपकिरी रंगाचे होतात. या प्रक्रियेदरम्यान फळातील व्हिटॅमिन सी आणि इतर महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट्स वेगाने खराब होतात. कापलेले फळ जितके जास्त काळ राहते, तितका त्याचा दर्जा आणि पौष्टिक मूल्य कमी होत जाते आणि खाण्यायोग्य राहत नाही.
कापलेली फळं एका तासापेक्षा जास्त वेळ रूम टेम्परेचरवर ठेवल्यास त्यामध्ये साल्मोनेला आणि ई. कोलायसारखे हानिकारक जीवाणू वाढू शकतात, ज्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. तसेच कापलेली फळे उघडी ठेवल्याने धूळ आणि माश्या निर्माण होऊ शकतात. माश्या धुळीतून उडून फळांवर सूक्ष्मजंतू टाकतात, ज्यामुळे आपण आजारी पडण्याची शक्यता वाढते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
