गुलाबाच्या बिया -
आयुर्वेदात गुलाबाच्या बियांचं तेल त्वचेचं पोषण करण्यासाठी खूप प्रभावी आहे असं सांगितलं आहे. या तेलात त्वचा मॉइश्चरायज करण्याचे गुणधर्म आहेत. यामध्ये ॲन्टी एजिंग गुणधर्म आढळतात. यासोबतच यामध्ये प्रोविटामिन्स, फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स देखील आढळतात ज्यामुळे त्वचेचं संरक्षण होतं.
Curry Leaves : कडिपत्त्याच्या पानांचा औषधी उपयोग, पोटाच्या तक्रारी होतील दूर
advertisement
जोजोबा फळाच्या बिया -
जोजोबा नावाच्या फळाच्या बियांपासून काढलेलं तेल त्वचेसाठी उत्कृष्ट असल्याचं म्हटलं जातं. या तेलात व्हिटॅमिन ई, कॉपर, झिंक, व्हिटॅमिन बी सोबत अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स आढळतात. यामध्ये आढळणारा ट्रान्सडर्मल पदार्थ त्वचेला हायड्रेट करतो आणि चेहऱ्यावरच्या बारीक रेषा कमी करतो.
Navratri 2024: नवरात्रीत कांदा-लसूण का खात नाही? खरं कारण तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल
व्हिटॅमिन ई -
व्हिटॅमिन ई तेल आणि कॅप्सूल त्वचेसाठी सर्वोत्तम तेल आहेत. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडेंटस त्वचेसाठी महत्त्वाचे आहेत. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे सूज आणि डागांपासून त्वचेचं संरक्षण होतं. यामुळे, त्वचेमधील कोलेजनचं उत्पादन जलद आणि नितळ होतं.
बदाम तेल -
बदामाचं तेल त्वचेसाठीही चांगलं मानलं जातं. यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात आढळतं. याशिवाय बदामाच्या तेलामध्ये पोटॅशियम, झिंक आणि प्रथिनं देखील असतात. यामुळे त्वचा तरुण दिसायला मदत होते.
शिया बटर -
आफ्रिकन शिया वनस्पतीपासून शिया बटर तयार होतं. हे बटर कडक असतं पण शरीरावर लावलं की ते हळूहळू वितळतं. हे मॉइश्चरायझर्स आणि केसांसाठीच्या उत्पादनांमध्ये वापरलं जातं. शिया बटर त्वचेचं पोषण करतं.
हे उपाय आहेतच पण चांगल्या त्वचेसाठी योग्य आहारही तितकाच महत्त्वाचा आहे.