जाणून घेऊयात, हिवाळ्यात थंडी आणि प्रदूषणापासून त्वचेचं संरक्षण कसं करायचं?
तज्ज्ञांच्या मते, त्वचेचा कोरडेपणा हा तुमच्या त्वचेच्या नैसर्गिक ओलाव्याच्या पातळीवर अवलंबून असतो. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी हिवाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. बहराइचचे जनरल फिजिशियन आणि त्वचारोगतज्ज्ञ डॉ. राहुल चौधरी यांनी हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला आणि सोप्या टिप्स दिल्यात. जाणून घेऊयात या टिप्स्.
advertisement
हिवाळ्यात त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्याचे उपाय
स्वत:ला हायड्रेट ठेवा:
हिवाळ्यात तहान नाही लागली तरीही पाणी पित राहा. यामुळे तुमचं शरीर हायड्रेट व्हायला मदत होते. ज्यामुळे त्वचा देखील हायड्रेट राहून त्वचेचा ओलावा टिकून राहतो. हिवाळ्यात दररोज किमान 2-3 लिटर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
मॉइश्चरायझरचा वापर :
हिवाळ्यात त्वचा मॉइश्चरायझ ठेवण्याची गरज असते. मॉइश्चरायझर त्वचेला आर्द्रता देऊन ती कोरडी होण्यापासून वाचवतात. त्यामुळे हिवाळ्यात मॉइश्चरायझरचा वापर केल्याने त्वचा कोमल आणि मुलायम राहायला मदत होते.
हे सुद्धा वाचा : Skin Care Tips: हिवाळ्यात हवीये कोमल आणि मुलायम त्वचा, मग टाळा ‘या’ चुका
सनस्क्रीनचा वापर :
उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही सनस्क्रीन वापरणे गरजेचं आहे. सनस्क्रीन सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचं संरक्षण करते.
क्लिंझरचा वापर:
हिवाळ्यात त्वचा खूप संवेदनशील होते. त्यामुळे त्वचेला इजा होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असलेत. क्लिन्जर वापराने त्वचा स्वच्छ व्हायला मदत होते. त्यामुळे त्वचेचा उजाळा मिळून ती मुलायम आणि तजेलदार होते.
केसांचीही घ्या काळजी:
आपल्या हातापायांच्या त्वचेप्रमाणे हिवाळ्यात केसांची आणि डोक्याच्या त्वचेचीही काळजी घेणं क्रमप्राप्त ठरतं. केस गळणं, केसात कोंडा होणं, डोक्याला खपल्या पडलं अशा त्रासांपासून दूर राहण्यासाठी केस धुण्यासाठी गरम पाणी आणि साबणाचा वापर करू नका. शॅम्पूने केस धुतल्यानंतर कंडिशनर वापरा.