Winter Skin Care Tips: किचनमधल्या या पदार्थांचा वापर करून हिवाळ्यात घ्या त्वचेची काळजी, त्वचा राहील तजेलदार आणि निरोगी

Last Updated:
Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे कारण हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडू शकते. अधिक काळ त्वचेकडे दुर्लक्षकेलं तर त्वचेला भेगाही पडू शकतात. त्वचेचा उजळपणा नाहीसा होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे अगदी घरगुती उपाय आणि गोष्टींमुळे तुमची त्वचा चांगली राहू शकते.
1/11
हिवाळा सुरू झाल्यावर जशी आजारपणांना सुरूवात होते तशीच सुरूवात त्वचेच्या समस्यांना होते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची जास्त काळजी घेणं क्रमप्राप्त ठरतं.

advertisement
2/11
दुधाच्या सायीमध्ये फॅट्स, प्रोटीन्स असतात जे खोलवर जाऊन त्वचेचं झालेलं नुकसान भरून काढतात. याशिवाय ते त्वचा हायड्रेट ठेवायला मदत करतात.

3/11
योगर्टमधल्या लॅक्टिक ॲसिडमुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो. याशिवाय प्रोबायोटिक्समुळे हे त्वचेला उजाळा द्यायला मदत करतात.

4/11
मधाच्या गुणधर्मांमुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो. यामुळे त्वचा कोरडी होवून भेगा पडण्याच्या प्रमाणात घट होते.

5/11
केळ्यात पोटॅशिअम चांगल्या प्रमाणात असतात. केळ्यांच्या वापरामुळे त्वचेचा ओलावा कायम राहतो. केळ्याच्या वापरामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन त्वचा मुलायम राहायला मदत होते.

6/11
काकडीमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात ज्यामुळे त्वचा चांगली राहायला मदत होते. काकडीच्या थंड गुणधर्मांमुळे त्वचेचाही ओलावा टिकून राहतो आणि त्वचा ही थंड राहायला मदत होते.

7/11
ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटिऑक्सिडंट्स, चांगले फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात. ते खोलवर जावून त्वचेला फायदा देतात. यामुळे त्वचेचं झालेलं नुकसान भरून येतं

8/11
कोरड्या त्वचेसाठी बदामाचं तेल हे फार फायदेशीर ठरतं. बदामाचं तेल त्वचेत लगेच झिरपतं त्यामुळे त्वचेचा ओलावा टिकून त्वचा तजेलदार राहते.

9/11
नारळात असलेल्या फॅटी ॲसिडमुळे त्वचेचा शुष्कपणा कमी होऊन त्वचेची झालेली झीज भरून निघते. नारळाच्या अँटिमायक्रोबॅक्टरिअल गुणधर्मांमुळे त्वचा विकार होत नाहीत.

10/11
कोरफडीच्या जेलमध्ये पॉलिसॅकराईड्स असतात. ज्यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो. त्यामुळे थंडीत त्वचा कोरडी पडत नाही.

11/11
ग्लिसरीनमुळे त्वचेला ओलावा टिकून राहतो. यामुळे त्वचेच्या पेशींचं झालेलं नुकसानही भरून येतं. त्यामुळे त्वचा उजळ दिसू लागते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement