PSL सुरु असतानाच BCCI ने मोठा डाव टाकला, दिग्गज खेळाडू पाकिस्तानी लीग सोडून IPL मध्ये येणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
खरं तर अनेक विदेशी खेळाडू आहेत, ज्यांनी पाकिस्तानी सूपर लीगमधून माघार घेत आयपीएलमध्ये प्रवेश केला आहे.
PSL 2026 : गुरुवारी 26 मार्च 2026 पासून पाकिस्तानी सूपर लीगला सूरूवात झाली आहे. या लीगचा आजचा दुसरा दिवस असताना बीसीसीआयने मोठा डाव टाकला आहे. बीसीसीआयच्या या खेळीने आता दिग्गज खेळाडू पाकिस्तानी सुपर लीग सोडून आयपीएल 2026 मध्ये सामील होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसणार आहे.
खरं तर अनेक विदेशी खेळाडू आहेत, ज्यांनी पाकिस्तानी सूपर लीगमधून माघार घेत आयपीएलमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्यांदा झिम्बाबेच्या ब्लेसिंग मुजरबानीने पीएसलमधून माघार घेतली होती. कोलकत्ता नाईट रायडर्सने त्याला बांग्लादेशच्या मुस्तफिजूर रहमानची रिप्लेसमेंट जाहीर 9.2 कोटी रूपयात ताफ्यात घेतलं होतं. त्यामुळे तो पीएसएल सोडून आयपीएलमध्ये आला होता.
श्रीलंकेचा टी20 कॅप्टन दासून शनाका हा लाहोक कलंदरकडून पीएसएल खेळणार होता. पण राजस्थान रॉयल्सने सॅम करन दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी दारून शनाकाला 2 कोटीमध्ये ताफ्यात घेतलं होतं. त्यामु्ळे तो पीएसएलला लाथ मारून आयपीएलला आला होता.
advertisement
160+ voices. 12 languages. 1 epic STARCAST! 🎙️
Voices that will bring TATA IPL 2026’s Bindaas energy to your screens! 😍#TATAIPL 2026 👉 Starts SAT, 28th MAR, 5:30 PM pic.twitter.com/YOCQS1Qwcy
— Star Sports (@StarSportsIndia) March 27, 2026
advertisement
ऑस्ट्रेलियाच्या स्पेन्सर जॉन्हसन क्वेटा ग्लेडीटोर्सकडून पीएसएल खेळणार होता. पण चेन्नई सुपर किंग्जने नथन इलिसच्या जाग्यावर स्पेन्सर जॉन्हसनला ताफ्यात घेतलं होतं. तसेच वेस्ट इंडिजटा गुडाकेश मोती देखील लाहोर लखंदरकडून पीएसएलमध्ये झळकणार होता. पण लखनऊ सुपर जाएटसने वानिंदु हसरंगाच्या जागी त्याला रिप्लेस केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान इतक्या खेळाडूंनी पाकिस्तानी लीग सोडली असताना बीसीसीआयने डाव टाकून आणखी एकाला गळाला लावलं आहे.त्याचं झालं असं की इंग्लंड दिग्गज क्रिकेटर आणि कॉमेंटेटर निकोलस नाईट हा पाकिस्तानी सूपर लीगच्या कॉमेन्ट्री पॅनेलचा भाग आहे. गुरूवारपासून पीएसएलला सूरूवात झाल्याने निकोलस नाईट यांनी देखील आपल्या पीएसएलमधील प्रवासाला सूरुवात केली होती.
advertisement
पण बीसीसीआयने आज आयपीएल 2026 साठी हिंदी आणि इंग्लीश कॉमेंन्ट्री पॅनेलची घोषणा केली आहे. या इंग्लीश कॉमेंट्री पॅनेलमध्ये एबी डिविलियर्स, डेल स्टेन,फॅब ड्यु प्लेसिस, केविन पीटरसन, अॅरोन फिंच, ईऑन मॉरगन, मायकल क्लार्क, मिचेक मॅकलगन, दिप दासगुप्ता, सुनील गावस्कर, रवि शास्त्री,हर्षा भोगले, ईयान बिशक, सायमन डॉल, डेनियल मोरीसन, दारेन गंगा, ग्रीम स्वान आणि निक नाईट यांच्या नावाची घोषणा केली आहे. यातले निक नाईट यांचे नाव हे पाकिस्तानी लीगच्या कॉमेंन्ट्री पॅनेलमध्ये देखील आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 6:59 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PSL सुरु असतानाच BCCI ने मोठा डाव टाकला, दिग्गज खेळाडू पाकिस्तानी लीग सोडून IPL मध्ये येणार?






