Winter Skin care tips: हिवाळ्यात पायांना भेगा पडतात? वापरा ‘या’ सोप्या टिप्स आणि घ्या पायांची काळजी
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Tips to avoid foot cracks in winter: हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळे हिवाळ्यात पायाला भेगा पडण्यांच्या तक्रारी वाढतात. योग्य काळजी आणि घरगुती उपायांनी या भेगांचा त्रास दूर होऊ शकतो.
मुंबई: हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळे हिवाळ्यात पायाला भेगा पडण्यांच्या तक्रारी वाढतात. योग्य काळजी आणि घरगुती उपायांनी या भेगांचा त्रास दूर होऊ शकतो. हिवाळ्यात थंडीमुळे आपल्याला तहान लागत नाही. त्यामुळे आपण पाणी कमी पितो पण कमी पाणी प्यायलाच्या फटका त्वचेला बसतो. शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने त्वचेवर सुरकुत्या येऊ शकतात. त्यामुळे त्वचा हायड्रेट नसणं किंवा जास्त वेळ अनवाणी चालल्यामुळेही पायांना भेगा पडू शकतात. जर या भेगांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर त्यातून रक्त येऊ शकतं जे वेदनादायक तर असेलच मात्र पायांच्या सौंदर्यातही बाधा आणतील.
नारळाच्या तेलाचा वापर:-
नारळाच्या तेलामध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. याशिवाय नारळाचं तेल त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. रात्री झोपण्यापूर्वी पायांना खोबरेल तेल लावून हलक्या हाताने मसाज केल्याने भेगांच्या तक्रारी दूर तर होतातच मात्र त्वचाही कोमल राहायला मदत होते.
advertisement
शिया बटर आणि ग्लिसरीन:-
शिया बटर आणि ग्लिसरीनसारखे मॉइश्चरायझर्स खोलवर जाऊन पायांना ओलावा देतात. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि भेगांच्या समस्येपासून आराम मिळतो.
पायांची स्वच्छता:-
अनेक जण अनवाणी चालतात किंवा दिवसभर सॉक्स घातल्याने त्यांच्या पायांना घाम येतो. अशावेळी जर पाय स्वच्छ धुतले नाही तर जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे संसर्गाचा धोका टाळण्यासाठी बाहेरून आल्यानंतर पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. यानंतर पायांना आणि टाचांना मॉइश्चरायझर किंवा क्रीम लावा. ज्यामुळे पाय कोमल आमि मुलायम राहतील आणि भेगा पडण्याचा धोका टाळता येईल.
advertisement
घरगुती उपचार:-
मध, ऑलिव्ह ऑईल आणि लिंबू यांचे मिश्रण पायांवर लावल्याने त्वचा ओलसर राहते आणि भेगा भरण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या पायांना जर भेगा पडल्या असतील तर या घरगुती उपायाने पाय मऊ आणि निरोगी राहायला मदत होईल.
advertisement
सुयोग्य आहार :-
त्वचेच्या देखभालीसाठी पोषण आहार घेणं फायद्याचं ठरतं. व्हिटॅमिन ई, झिंक आणि ओमेगा -3 फॅटी ॲसिडयुक्त हिरव्या भाज्या, फळं आणि मासं खाल्ल्यामुळे त्वचेला आवश्यक ती पोषण तत्त्वे मिळतात, ज्यामुळे पायांना भेगा पडण्याची शक्यता मावळते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 24, 2024 7:48 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Skin care tips: हिवाळ्यात पायांना भेगा पडतात? वापरा ‘या’ सोप्या टिप्स आणि घ्या पायांची काळजी