Winter Health Tips : हिवाळ्यात पायांना भेगा पडतात? किचनमधील 'हा' पदार्थ ठरेल रामबाण, आठवड्याभरात दिसेल फरक

Last Updated:
हिवाळ्यात तापमानात घट झाल्याने आरोग्याच्या विविध समस्या जाणवू लागतात. त्यापैकीच एक समस्या म्हणजे पायांना भेगा पडणे. हिवाळ्यात पाय कोरडे पडल्याने त्यावर भेगा पडतात आणि बऱ्याचदा त्यात माती, पाणी इत्यादी गेल्याने तीव्र वेदना जाणवू लागतात. तेव्हा हिवाळ्यात पायांना भेगा पडूच नये किंवा भेगा पडल्यास त्यावर कोणते उपाय करावेत याविषयी जाणून घेऊयात.
1/5
हिवाळ्यात पायांना भेगा पडल्यास तुम्ही त्यावर किचनमध्ये उपलब्ध असलेले शुद्ध गायीचे तूप लावू शकता. रात्री झोपताना पाय स्वच्छ धुवून ज्या ठिकाणी भेगा पडल्या आहेत तेथे शुद्ध गायीचे तूप लावा. यामुळे आठवड्याभरात पायांच्या भेगा नाहीश्या होतील आणि तुम्हाला होणाऱ्या त्रासापासून आराम मिळेल.

advertisement
2/5
नारळाचे तेल हे बहुउपयोगी आहे, त्याचा वापर विविध गोष्टींसाठी केला जातो. नारळाचे तेल तुमच्या पायांना पडलेल्या भेगांसाठी देखील रामबाण उपाय ठरू शकतो. रात्री झोपताना पाय स्वच्छ धुवून त्यावर नारळाचे तेल लावा यामुळे पाय मॉइश्चराइज राहतील आणि काही दिवसात पायांवरील भेगा दूर होतील.

3/5
हिवाळ्यात त्वचा ड्राय होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही केळ्याचा देखील उपयोग करू शकता. 2 पिकलेली केळी घेऊन ती पूर्णपणे क्रश करा आणि पायांवर पडलेल्या भेगांमध्ये 20 मिनिटं लावून ठेवा. काहीवेळाने पाय धुवून काढा. असे दररोज केल्याने एक ते दोन आठवड्यात तुमच्या पायांवरील भेगा दूर होतील.

4/5
पायांमधील भेगा दूर होण्यासाठी तुम्ही पाय कोमट पाण्यात 20 मिनिटं पाय बुडवून ठेऊ शकता. यानंतर स्क्रबरने पायांचे तळवे घासून काढा ज्यामुळे डेड स्किन निघून जाईल. यानंतर पायांना मोहरीचे तेल लावून मसाज करा आणि रात्री झोपताना पायात मोजे घाला. या घरगुती उपायांनी पायांवर पडलेल्या भेगा दूर होतील.

5/5
मध हे देखील एक उत्तम मॉश्चरायझर आहे. पायाची त्वचा आर्द्र ठेवण्यासोबतच तेथील त्वचेचं पोषण करण्याचं काम मध करत. तेव्हा कोमट पाण्यात अर्धा कप मध घालून त्यात किमान 20 मिनिटं पाय बुडवून ठेवावेत. पाण्यातून पाय बाहेर काढल्यावर ते नीट कोरडे करून घ्यावेत. यामुळे पायांवर पडलेल्या भेगांवर योग्य परिणाम होईल आणि पाय मुलायम राहतील. (सदर माहिती ही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा कोणत्याही पदार्थाचा शरीरावर वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement