Skin Care Tips: हिवाळ्यात हवीये कोमल आणि मुलायम त्वचा, मग टाळा ‘या’ चुका

Last Updated:
Winter Skin Care Tips: हिवाळ्यात थंडी आणि वातावरण बदलामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव बनते. वेळीच काळजी घेतली नाही तर त्वचेला भेगा पडून त्यातून रक्त सुद्धा येऊ शकतं. विविध क्रिम, बॉडीलोशन वापरूनही त्वचा कोरडी होण्याचं प्रमाण कमी होत नसेल तर तुम्हाला क्रिम नाही तर तुमच्या आहारात आणि दिनचर्येत बदल करण्याची गरज आहे. जाणून घेऊयात हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स.
1/7
हिवाळ्यात थंडी आणि कोरड्या वातावरणाचा त्वचेवर विपरीत परिणाम होण्याची भीती असते. अशा वेळी त्वचा हायड्रेट ठेवण्याची गरज असते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी जरी तुम्हाला तहान लागली नाही तरीही ठराविक अंतराने पाणी पित राहा.

advertisement
2/7
व्हिटॅमिन सी हे त्वचेच्या फायद्यासाठी असतं. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेली फळं,भाज्या आणि अन्नपदार्थ खाणं फायद्याचं ठरतं. यामुळे त्वचा कोमल आणि मुलायम तर होतेच सोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

3/7
थंडीत त्वचा कोरडी पडण्याची भीती असल्याने त्वचेला जास्त मॉइश्चरायझरची गरज असते. त्यामुळे हिवाळ्यात चांगलं मॉइश्चरायझर वापरण्याची गरज आहे. जर तुम्ही नियमितपणे मॉइश्चरायझर वापरलं नाही तर, तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते.

4/7
उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही त्वचेला सनस्कीन लोशन लावण्याची गरज आहे. कारण सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही जरी घरात असाल तरीही सनस्कीन लोशन लावा. यामुळे त्वचा कोमल राहायला मदत होईल.

5/7
ऍसिड-आधारित स्कीनकेअर उत्पादनं ही शरीर आणि त्वचेसाठी केव्हाही घातकच. त्यामुळे अशी उत्पादनं वापरणं टाळा, मात्र जर तुमच्याकडे पर्याय नसेल तर किमान हिवाळ्यात तरी या उत्पादनांचा वापर करू नका, यामुळे त्वचा आणखी कोरडी होऊ शकते.

6/7
हिवाळ्यात थंड वातावरणात नखं उघडी राहिल्याने ती कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे त्वचेप्रमाणे नखांची काळजी घेण्याची गरज आहे. हातमोजे घातल्याने नखं सुरक्षित राहतात.

7/7
खूपच जास्त गरम पाण्याने अंघोळ करणं हे आरोग्यासाठी केव्हाही घातकच. हिवाळ्यात थंडी वाजते म्हणून जास्त गरम पाण्याने अंघोळ करणं टाळा. कारण गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement