TRENDING:

Microwave Tips: ओव्हनमध्ये जेवण गरम करत आहात, ‘घ्या’ ही काळजी नाहीतर ओव्हन बनेल ‘बॉम्ब’

Last Updated:

Tips to use microwave oven: तुम्ही सुद्धा जेवण गरम करण्यासाठी ओव्हन वापरत असाल तर तुम्हाला खबरदारी ही घ्यावी लागणार आहे. अन्यथा तुमच्या घरातला ओव्हन तुमच्यासाठी काळ बनू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मायक्रोवेव्ह ओव्हन आज अनेकांच्या किचनचा एक अविभाज्य भाग झालाय. अगदी काही वर्षांपूर्वी घरी केक बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ओव्हनचा वापर आता चपात्या गरम करण्यासाठी सुद्धा केला जातो. तुम्ही पण जेवण गरम करण्यासाठी ओव्हन वापरत असाल तर तुम्हाला खबरदारी 'ही' घ्यावी लागणार आहे. अन्यथा तुमच्या घरातला ओव्हन तुमच्यासाठी 'काळ' बनू शकतो.
प्रतिकात्मक फोटो : ओव्हनमध्ये जेवण गरम करता? काळजी घ्या नाहीतर ओव्हन बनेल बॉम्ब
प्रतिकात्मक फोटो : ओव्हनमध्ये जेवण गरम करता? काळजी घ्या नाहीतर ओव्हन बनेल बॉम्ब
advertisement

अन्न गरम करण्यासाठी ओव्हन नकोच:

ओव्हनमध्ये अन्न गरम करून खाण्याला अनेक आहारतज्ज्ञ विरोध करतात. त्यांच्या मतानुसार अन्न मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये गरम करून खाल्ल्याने त्याकली पोषकद्रव्ये कमी होतात. याशिवाय ओव्हनमध्ये अन्न शिजवून किंवा गरम करून खाल्ल्याने आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

हे सुद्धा वाचा :Reheated rice can be toxic?: ऐकावं ते भयंकरच ! भात पुन्हा तापवल्याने होऊ शकतो विषारी; ‘हा’ अवयव निकामी होण्याची भीती

advertisement

ओव्हनमध्ये विशिष्टच भांडी का वापरावीत ?

ओव्हन हे धातूपासून बनवलेलं बनलेले असतं. त्यात एक छोटा ट्रान्समीटर असतो जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार करून त्यातून किरणं उत्सर्जित करते आणि त्यामुळे कमी वेळात अन्न गरम व्हायला मदत होते. मात्र अनेकदा, लोखंड, स्टील, ॲल्युमिनियम पासून बनवलेली भांडी ही ओव्हनमध्ये वापरल्यामुळे ती लवकर गरम होऊन त्यात स्पार्किंग व्हायला लागतं आणि अशा स्पार्किंगमुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा धोका असतो, ज्यामुळे अवघ्या काही मिनीटात तुमचं घर जळून भस्मसात होऊ शकतं. त्यामुळे ओव्हनमध्ये ओव्हनसेफ भांड्याचा वापर करा, जेणेकरून तुमचं अन्न आणि तुम्ही दोघेही सुरक्षित राहू शकाल.

advertisement

या वस्तूंचा वापर टाळा :

प्लास्टिकची भांडी :

अनेक जण ओव्हनमध्ये अन्न गरम करण्यासाठी प्लास्टिकच्या भांड्याच्या वापर करतात. हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. अनेक संशोधनातून असं आढळून आलंय की, एखादी गोष्ट प्लास्टिकच्या भांड्यात गरम केली किंवा अगदी उकळता चहा हा प्लास्टिकच्या पिशवीतून पार्सल जरी आणण्याचा प्रयत्न केला तरीही गरमीमुळे प्लास्टिक किंवा त्यातली घातक रसायनं वितळून, त्याचा अंश त्या पदार्थात किंवा चहामध्ये उतरू शकतो. कॅन्सरचा धोका वाढतो. गेल्या काही वर्षात कॅन्सरच्या रूग्णांमध्ये झालेल्या वाढीमागे प्लास्टिकच कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

advertisement

योग्य भांड्याचा वापर करा:

जर तुम्हाला ओव्हनमध्ये एखादी गोष्ट गरम करायची आहे तर त्यासाठी योग्य त्या म्हणजेच ओव्हन सेफ (Microwave Safe utensils) भांड्याचा वापर करा. तुम्ही चुकून जरी स्टील किंवा ॲल्युमिनियमच्या भांडं ओव्हनमध्ये टाकलं स्पार्किंग होऊन स्फोट होण्याची भीती असते. कारण स्टील किंवा ॲल्युमिनियम हे विजेचे उत्तम वाहक आहेत.

ॲल्युमिनियम फॉईलचा वापर नको:

advertisement

अनेक वेळा काही जण रोटी, पराठे, किंवा अन्य भाज्या गरम करण्यासाठी त्या ॲल्युमिनियम फॉईल किंवा ॲल्युमिनियमच्या कंटेनरमध्ये  गरम करतात. असं करणंही चुकीचं आहे. यामुळे सुद्धा आग लागण्याची भीती आहे. आत्ता जरी ओव्हन सेफ ॲल्युमिनियम फॉईल्स किंवा कंटेनर आले जरी असले तरीही प्लास्टिक प्रमाणे त्यात ॲल्युमिनियम मधले घातक पदार्थ वितळून अन्नात मिसळण्याचा धोका असतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Microwave Tips: ओव्हनमध्ये जेवण गरम करत आहात, ‘घ्या’ ही काळजी नाहीतर ओव्हन बनेल ‘बॉम्ब’
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल