Reheated rice can be toxic?: ऐकावं ते भयंकरच ! भात पुन्हा तापवल्याने होऊ शकतो विषारी; ‘हा’ अवयव निकामी होण्याची भीती

Last Updated:

Reheated rice can be toxic?: साधा भात असो की मसाले भात, बिर्याणी असो की दाल खिचडी कोणत्याही स्वरूपातला भात हा कोणाला ना कोणाला तरी आवडतोच. मात्र तुम्हाला माहिती आहे का, की जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने भात खाल्ला तर तो तुमच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो.

प्रतिकात्मक फोटो : ऐकावं ते भयंकरच ! भात पुन्हा तापवल्याने होतो विषारी?
प्रतिकात्मक फोटो : ऐकावं ते भयंकरच ! भात पुन्हा तापवल्याने होतो विषारी?
मुंबई: भात हा अनेकाच्या अन्नातला अविभाज्य भाग. मुंबई असो की मद्रास, बंगाल असो की बंगळुरू, प्रत्येकाच्या जेवणात एकदा तरी भात असतोच असतो. भात आवडत नाही अशी व्यक्ती शोधून सापडणं कठीण. साधा भात असो की मसाले भात, बिर्याणी असो की दाल खिचडी कोणत्याही रूपातला भात हा कोणाला ना कोणाला तरी आवडतोच. मात्र तुम्हाला माहिती आहे का, की तुमच्या आवडीचा भात तुमच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो ? खरं वाटत नाहीये ना, मग जाणून घ्या, ‘या’ चुकीच्या पद्धतीने भात खाणं तुमच्यासाठी ठरू शकतं धोकादायक.

भात पुन्हा गरम करणं धोक्याचं

गरमागरम वरण आणि भात, त्यावर तुपाची धार आणि चवीला लिंबू. इतक्या साधं जेवणाचं नाव ऐकूनही डोळ्यासमोर पंचपक्वान्नाचं ताट उभं राहिलं. गरमागरम भात आपण सहज फस्त करू शकतो. मात्र जर भात उरला आणि तो फ्रिजमध्ये ठेऊन नंतर तो गरम करून खाण्याचा विचारही करू नका. कारण चवीच्या बाबतीत तुमचा जीव का प्राण असलेला हा भात पुन्हा गरम केल्यानंतर तुमच्यासाठी तो जीवघेणा ठरू शकतो. कारण असं केल्याने त्यात जीवाणू तयार होऊ शकतात, जे शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात.
advertisement
advertisement
आहारतज्ज्ञ डिंपल जांगडा यांच्या मते, तांदळामध्ये बॅसिलस बॅक्टेरिया असतात, ज्यांची वाढ सर्वसामान्य तापमानात होते. त्यामुळे भात तयार केल्यानंतर तो तसाच ठेवल्यास त्यात जिवाणूंची वाढ होऊ शकते. असं म्हणतात की अन्न गरम केल्याने त्यातले जीवाणू-विषाणू नष्ट होतात. मात्र भाताच्या बाबतीत तसं होत नाही. भात पुन्हा गरम जरी केला तरी बॅसिलस बॅक्टेरिया पूर्णपणे मरत नाहीत आणि जरी मेले तरी ते यकृताला हानी पोहोचवणारे एफ्लाटॉक्सिन विषारी पदार्थ सोडतात. त्यामुळे भात केवळ दूषितच नाही तर विषारी सुद्धा बनतो. यामुळे अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढू शकतो, त्यामुळे शिळा किंवा उरलेला भात गरम करून खाल्ल्यानंतर जर तुम्हाला पोटदुखी, उलट्या, अतिसार किंवा मळमळीचा त्रास झाला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण या विषारी पदार्थांमुळे यकृत आणि मूत्रपिंडांना धोका होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या जेवणापुरता आवश्यक तेवढाच भात बनवा. त्यामुळे तो उरण्याचा आणि शरीरासाठी घातक बनण्याचा धोका टळेल.
advertisement

भात गरम करताना ‘घ्या’ ही काळजी

तुमच्या जेवणातला भात काही कारणांमुळे उरलाच आणि तो तुम्हाला टाकून देणं जीवावर आलं असेल तर तो फ्रिजमध्ये झाकण असलेल्या डब्यात ठेवून द्या. फ्रिजचं तापमान हे 4 डिग्री सेल्सियस असेल याची खात्री करून घ्या. याशिवाय उरलेला भात फ्रिजमध्ये एक दिवसापेक्षा जास्त ठेवणं टाळा कारण त्यामुळे त्यात बॅक्टेरियाची वाढ होण्याचा धोका अधिक असतो. फ्रिजमधून काढलेला भात गरम करताना तो 75 डिग्री सेल्सियसवर गरम करा. गरम करताना तो वारंवार नीट ढवळून एकत्र करा. भाताचा प्रत्येत दाणा हा व्यवस्थित गरम होईल याची खात्री. जरं असं झालं नाही तर बॅक्टेरिया भातामध्ये विषारी पदार्थ सोडू शकतात जे शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Reheated rice can be toxic?: ऐकावं ते भयंकरच ! भात पुन्हा तापवल्याने होऊ शकतो विषारी; ‘हा’ अवयव निकामी होण्याची भीती
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement