Lifestyle: भात शिजवण्याआधी तांदूळ किती वेळा धुवायचे, शिजवण्याची योग्य पद्धत काय?
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
भारतातील मोठी लोकसंख्या जेवणात भात खाते. भात खाल्ल्याशिवाय अनेकांचं जेवण पूर्णच होत नाही. एकवेळ पोळी नसली तरी चालेल, पण भात लागतो. देशभरात ब्राउन व व्हाईट राईसचा वापर होतो. लोक आपल्या आवडीप्रमाणे भात शिजवतात.
advertisement
advertisement
जर्नल ऑफ हॅझार्डस मटेरिअल्समध्ये प्रकाशित 2021 च्या रिपोर्टनुसार, शिजवण्यापूर्वी तांदूळ धुतल्याने त्यातील मायक्रोप्लास्टिक्स निघून जातात, ज्याचा वापर पॅकेजिंग दरम्यान होतो. तांदूळ धुतल्याने 20 ते 30 टक्के मायक्रोप्लास्टिक्स कमी होतात. त्यामुळे तांदूळ धुवायचे कसे? तांदूळ उकळून त्याचे पाणी फेकून देणे योग्य आहे का? या प्रश्नांची उत्तरं एक्सपर्ट्सकडून जाणून घेऊयात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement