Beed Police Bharti : आईबाप ऊसतोड मजूर, अठराविश्व दारिद्रय! पोलीस भरतीला उतरला अन् 1600 मीटरच्या 'टॉपर'चा दुर्दैवी मृत्यू
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Beed police bharati youth dies of heart attack : पोलीस व्हायचं स्वप्न उराशी धरून भरतीसाठी आलेला एक तरुण 1600 मीटर धावण्याची चाचणी जिंकल्यानंतर काही वेळातच मृत्यूमुखी पडल्याने एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालंय.
Beed Crime News : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीची प्रकिया राबवली जात आहे. अशातच बीड येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचं पहायला मिळालं. पोलीस व्हायचं स्वप्न उराशी धरून भरतीसाठी आलेला एक तरुण 1600 मीटर धावण्याची चाचणी जिंकल्यानंतर काही वेळातच मृत्यूमुखी पडल्याने एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालंय. मैदानावर आपलं कसब दाखवत असतानाच काळानं त्याच्यावर घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पुण्यात रिक्षा चालवायचा...
मृत तरुणाचे नाव दीपक भास्कर वाव्हळे (वय 26 वर्षे) असून तो परळी तालुक्यातील मांडखेल इथं राहत होता. दीपक पुण्यामध्ये रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाला हातभार लावत असे, मात्र पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तो गेल्या 2 महिन्यांपासून गावी सराव करत होता. बुधवारी दुपारी 12.55 वाजता त्याने मोठ्या जिद्दीने धावण्याची रेस पूर्ण केली आणि त्यात तो पहिला देखील आला पण थोड्याच वेळात त्याच्यावर काळाचा घात झाला.
advertisement
वडील ऊसतोडणी ट्रॅक्टरवर मजूर
धावण्याची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर काही वेळातच दीपकला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दीपक हा कुटुंबातील मोठा मुलगा होता, त्याचे वडील ऊसतोडणी ट्रॅक्टरवर मजूर म्हणून काम करतात तर आई शेतमजुरी करते. त्याचा हा पोलीस भरतीचा पहिलाच प्रयत्न होता, मात्र दुर्दैवाने त्याचे हे स्वप्न अपूर्णच राहिलं. लेकाच्या मृत्यूनंतर आता आईवडिलांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
डॉक्टरांनी काय सांगितलं?
दरम्यान, मैदानी चाचण्या किंवा मॅरेथॉनमध्ये उतरण्यापूर्वी तरुणांनी आपल्या आरोग्याची बेसिक तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सराव करताना शरीराची क्षमता आणि हृदयाची स्थिती लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. धावताना हृदयाचे ठोके 140 ते 180 पर्यंत जाणे सामान्य असले तरी, सराव नसताना अचानक धावल्यास हृदयावर प्रचंड ताण पडू शकतो. या घटनेमुळे पोलीस भरती प्रक्रियेसाठी आलेल्या इतर उमेदवारांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 7:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Police Bharti : आईबाप ऊसतोड मजूर, अठराविश्व दारिद्रय! पोलीस भरतीला उतरला अन् 1600 मीटरच्या 'टॉपर'चा दुर्दैवी मृत्यू








