Dal khichadi for weight loss वजन कमी करायचं आहे मग बिनधास्त खा वरण भात; दालखिचडीचा शरीराला होईल फायदा

Last Updated:

Khichdi Benefits For Weight Loss खिचडी हे डाळ आणि तांदूळ यांचं मिश्रण आहे. अनेक वर्षांपासून भारतीय घरांमध्ये खिचडी खाल्ली जात आहे. दाल खिचडी, पालक खिचडी, स्प्राऊट खिचडी, असे खिचडीचे विविध प्रकार आहेत. यात तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या, किंवा अन्य गोष्टी टाकून नवनवीन प्रकारची खिचडी बनवू शकता.

प्रतिकात्मक फोटो : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल ‘ही’ दालखिचडी
प्रतिकात्मक फोटो : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल ‘ही’ दालखिचडी
Khichdi Benefits For Weight Loss बदलती जीवनशैली आणि जंकफूड यामुळे अनेकांना लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटीचा सामना करावा लागतोय. वजन कमी करण्यसाठी अनेकजण शर्थीचे प्रयत्न करतात. त्यातच वजन कमी करण्यासाठी काही जण भात तर काही जण चपाती न खाण्याचा सल्ला देतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशी माहिती सांगणार आहोत की ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तुम्ही जर रोज वरण-भात किंवा दाल-खिचडी खात असाल तर तुमचं वजन वाढणार नाही उलट कमी होईल. खिचडी एक परीपूर्ण आहार असून खिचडीमुळे वजन व्हायला मदत  होत असल्याचा दावा न्युट्रिशनिस्ट डॉ. अदिती शर्मा यांनी केलाय.खिचडी हे डाळ आणि तांदूळ यांचं मिश्रण आहे. अनेक वर्षांपासून भारतीय घरांमध्ये खिचडी खाल्ली जात आहे.  दाल खिचडी, पालक खिचडी, स्प्राऊट खिचडी, असे खिचडीचे विविध प्रकार आहेत. यात तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या, किंवा अन्य गोष्टी टाकून नवनवीन प्रकारची खिचडी बनवू शकता.
 कमी फॅट आणि कोलेस्टेरॉल
खिचडीत फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी एक फायदेशीर आहे. खिचडी कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी एक चांगला उत्तम आहार आहे.
पचनक्रिया चांगली राहते
खिचडीत फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. जे हेल्दी बॅक्टेरियांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते.  पचनक्रियेत सुधारणा होऊन आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. याशिवाय संतुलित पचनक्रिया शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी करण्यास मदत करते. त्यामुळे वजन वाढत नाही.
advertisement
पूर्णांन्न
खिचडीतील तांदूळ कार्बोहायड्रेट्सचा एक चांगला स्त्रोत आहे तर डाळींतून शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळते. खिचडी खाल्ल्यानं मांसपेशींना पोषकतत्वं मिळतात.खिचडीतल्या फायबर्समुळे पचनक्रिया चांगली राहते. भूक नियंत्रित राहते, फॅट लॉस होण्यास मदत होते. रोज गरमागरम खिचडी खायला हवी असं डॉ. आदिती सांगतात.
advertisement
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
खिचडी खाल्ल्यानं शरीरातील डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया व्यवस्थित होते. खिचडी खाल्याने तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं त्यामुळे भूक लागत नाही. त्यामुळे अरटबट चरबट खाणं टाळलं जातं, ज्यामुळे अतिरिक्त कॅलरीज पोटात जात नाहीत.
लो ग्लायसेमिक इंडेक्स
खिचडीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच  कमी असतो. याचा अर्थ असा की ब्लड फ्लोमध्ये हळूहळू ग्लुकोज सोडलं जातं. ज्यामुले रक्तातील साखरेची वाढ रोखता येते. खिचडीचे नियमित सेवन केल्यानं ब्लड  शुगर स्पाईक होण्यापासून रोखता येतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dal khichadi for weight loss वजन कमी करायचं आहे मग बिनधास्त खा वरण भात; दालखिचडीचा शरीराला होईल फायदा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement