पसूल जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : पसूलमधील विजयी उमेदवारांची यादी, कुणी उधळला गुलाल?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sangli Pasul ZP election result 2026 : मतदानामध्ये पलूस तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली असून, येथे सर्वाधिक 75.69 टक्के इतके विक्रमी मतदान झाले होतं.
Sangli Pasul ZP election result 2026 : पलूस तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सध्या राजकीय वातावरण अत्यंत चुरशीचे झाले आहे. या तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण 4 गट असून, त्यांत काँग्रेस आणि भाजप यांच्यात प्रामुख्याने आमनेसामने लढत झाली. 7 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या मतदानामध्ये पलूस तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली असून, येथे सर्वाधिक 75.69 टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे.
कुंडल गटामध्ये एक अत्यंत रंजक कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. येथे आमदार अरुण लाड यांच्या सून धनश्री लाड (भाजप) आणि आमदार विश्वजीत कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड (काँग्रेस) यांच्यात विरुद्ध सामना होत आहे. नातेसंबंध बाजूला सारून दोन्ही बाजूंनी विजयासाठी मोठी ताकद लावली असून, कुंडलची जनता कोणाला कौल देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
advertisement
आज म्हणजेच 9 फेब्रुवारीला या सर्व 4 गटांचे निकाल जाहीर होणार असून, विजयाचा गुलाल कोण उधळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तालुक्यातील मतदारांनी नोंदवलेला विक्रमी टक्का हा प्रस्थापित सत्तेच्या बाजूने जातो की परिवर्तनाची लाट आणतो, हे काही तासांतच स्पष्ट होईल. पलूसच्या या निकालाचा परिणाम केवळ तालुक्यावरच नाही, तर संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या सत्तेच्या समीकरणावर होणार आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 11:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
पसूल जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : पसूलमधील विजयी उमेदवारांची यादी, कुणी उधळला गुलाल?







