Health Tips Marathi: चपाती की भात? मधुमेही, वजन नियंत्रणात ठेवणाऱ्यांसाठी योग्य काय ठरतं

Last Updated:
Health Tips Marathi: मधुमेहींचा आहार यावर कायम चर्चा होत असते. काय खावं आणि काय नको याबद्दल लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न पडतो की पोळी खावी की भात?
1/7
त्यासोबतच वजनही कमी करायचं असेल तर भात खावा किंवा पोळी खावी की याबद्दल संभ्रम असतो. बघुया त्याविषयी आहार तज्ज्ञ काय सांगतात..

advertisement
2/7
आहारतज्ञांच्या मते, भातापेक्षा पोळीमध्ये खनिजं जास्त असतात. तसंच पोळी किंवा भात या दोन्हीमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. भातामध्ये जास्त प्रथिनं आणि पोळीमध्ये जास्त फायबर असतं. पांढऱ्या तांदळात प्रथिनं आणि फायबर दोन्ही कमी प्रमाणात असतात.

3/7
भात किंवा चपाती हे दोन्ही -अन्नपदार्थ वेगवेगळ्या प्रकारे वजन कमी करण्यात मदत करतात. एक वाटीभर भात जरी खाल्ला तरी काही वेळानं भूक लागते. ते लवकर पचवता येते. तर, चपातीमुळे पोट बराच काळ भरलेलं राहतं.

4/7
वजन कमी करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही चपातीचा पर्याय निवडा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही दोन चपात्या खात असाल तर त्या ऐवजी एक चपाती खा आणि सोबत दोन वाट्या भाज्या खा. याशिवाय तुमच्या आहारात प्रथिनं आणि फायबरयुक्त गोष्टींचा समावेश करा.

5/7
चपाती आणि भात यांत काय खाणं योग्य आहे असा प्रश्न मधुमेही रुग्णांमध्ये अनेकदा पडतो. तर आहारतज्ज्ञांच्या मते, मधुमेहींसाठी पांढ-या भातापेक्षा पोळी किंवा चपाती हा चांगला पर्याय असल्याचं सांगितलं जातं.

6/7
मधुमेहींसाठी भात हा चांगला पर्याय नाही. पचन जलद होण्यासोबतच शरीरातील रक्तातील साखर वाढते. तर, पोळीमध्ये 'लो-जीआय कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स' असतात, जे सेवन केल्यानं मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

7/7
चपातीमध्ये सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी पोषक तत्वं जास्त प्रमाणात असतात, परंतु हे सर्व तांदळात कमी आढळतात.(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय ज्ञानावर आधारित आहे. कोणतंही डाएट प्लॅन करताना आहार तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement