TRENDING:

Beauty Tips : डबल चीन दिसतेय, चेहऱ्याचा आकार बिघडतोय? फक्त 5 मिनिटं करा 'हे' फेस योगा, दिसेल फरक

Last Updated:

Face yoga to get rid off double chin : ही योगासनं अतिशय सोपी आहेत आणि तुही रोज अगदी 5 मिनिटही केली तरी फक्त 2-3 आठवड्यांत तुमच्या चेहऱ्यावर खूप बदल दिसेल आणि डबल चीन कमी होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वयानुसार किंवा कधीकधी वजन वाढल्यामुळे आपली हनुवटीचा आकार बदलू लागतो. म्हणजेच हनुवटी जाड होऊ लागते. हे कोणालाच आवडत नाही. प्रत्येकाला आपला चेहरा योग्य आकारात हवा असतो. पण काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला असे काही योगासन सांगणार आहोत, जे तुमच्या हनुवटीला आकार देण्यास मदत करतील.
डबल चीन घालवण्यासाठी फेस योगा..
डबल चीन घालवण्यासाठी फेस योगा..
advertisement

ही योगासनं अतिशय सोपी आहेत आणि तुही रोज अगदी 5 मिनिटही केली तरी फक्त 2-3 आठवड्यांत तुमच्या चेहऱ्यावर खूप बदल दिसेल आणि डबल चीन कमी होईल. तुमच्या चेर्याला छान आकार येईल

चीक लिफ्ट : हे योगासन करण्यासाठी हसा आणि हसताना बोटांनी गाल वर उचला. 10 सेकंद धरा या स्थित राहा आणि नंतर सोडा. 5 वेळा याची पुनरावृत्ती करा. हे गालांना टोन देते आणि जबड्याची रेषा सुधारते.

advertisement

फिश फेस : हे योगासन कारण्यासाठी तुमचे गाल आत ओढा आणि माशासारखा चेहरा बनवा. या स्थितीत 10 सेकंद राहा आणि 5 वेळा याची पुनरावृत्ती करा. याने तुमच्या जबड्याचा आणि गालांचा व्यायाम होतो.

जॉ स्ट्रेच : यामध्ये तुम्हाला तुमचे डोके वरच्या दिशेला न्यावे लागेल, जबडा सैल सोडा करा आणि तो खालच्या दिशेने खेचा. 5 सेकंद या स्थितीत राहा आणि 5 वेळा याची पुनरावृत्ती करा. अशाप्रकारे जबडा ताणल्यामुळे डबल चीन हळूहळू कमी होते.

advertisement

टंग प्रेस : तुमची जीभ टाळूला चिकटवा आणि हनुवटीवर प्रेशर येऊ द्या. 10 सेकंद या स्थितीमध्ये राहा आणि 5 वेळा याची पुनरावृत्ती करा. याने केवळ जबड्याचा भागच नाही, संपूर्ण चेहरा टोन होतो. तसेच सुरकुत्या कमी होतात आणि स्नायूंना बळकटी मिळते.

नॅच्युरल स्माइल विथ रेजिस्टन्स : यामध्ये तुम्हाला हलके स्माईल करून तुमच्या बोटांनी हलकेच गाल दाबावे लागतील. ही स्थितीही 10 सेकंद होल्ड करा आणि 5 वेळा याची पुनरावृत्ती करा. यामुळे चेहऱ्याचे स्नायू टाईट होतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जालन्याच्या शेतकऱ्यानं घेतलं पैशाचं पीक! एका एकरात 10 लाखांची कमाई, काय केलं? Vi
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Beauty Tips : डबल चीन दिसतेय, चेहऱ्याचा आकार बिघडतोय? फक्त 5 मिनिटं करा 'हे' फेस योगा, दिसेल फरक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल