तज्ज्ञांच्या मते, फॅटी लिव्हरची समस्या वाढल्यास लिव्हर कॅन्सरही होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीचं लिव्हर नीट काम करत नसेल, तर शरीरातील फॅट्स आणि प्रोटिन कोलेस्टेरॉल लेव्हल किंवा एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटिन) म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
लिव्हरमुळे हार्ट अटॅकचा धोका कसा वाढतो?
लिव्हर ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. रवी यांनी सांगितलं की, लिव्हरच्या समस्या हृदयावर सर्वाधिक परिणाम करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. चरबीचं ऊर्जेत रूपांतर करण्यात आणि आवश्यक प्रोटिन्स तयार करण्यात लिव्हर महत्त्वाची भूमिका बजावतं, जे संतुलित हृदयप्रणालीसाठी आवश्यक आहे.
advertisement
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर किंवा क्रॉनिक लिव्हरसारख्या परिस्थितीमुळे लिव्हर खराब होतं. ते लिपिड मेटॅबॉलिझम रोखतं परिणामी, शरीरातील कॉलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढते. लिपिड मेटॅबॉलिझममधील असंतुलनामुळे अॅथेरोस्क्लेरॉसिस होऊन रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.
कोणती काळजी घ्यावी?
1. वजन नियंत्रणात ठेवा
लठ्ठपणामुळे फॅटी लिव्हर आजार होऊ शकतो. जर तुम्हाला फॅटी लिव्हरचा धोका कमी करायचा असेल तर तुमचं वजन कमी करा. वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा, जंक फूडपासून दूर रहा आणि हेल्दी डाएट घ्या.
2. अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने फॅटी लिव्हर होऊ शकतो. जर तुम्हाला फॅटी लिव्हर असेल तर अल्कोहोलचं सेवन मर्यादित करणं किंवा पूर्णपणे टाळणं गरजेचं आहे.
Banana Tea : वजनासोबत ब्लड प्रेशरही राहातं नियंत्रित! केळीच्या चहाचे हे अद्भुत फायदे माहितीये?
3. तब्येत जपा
जर तुम्हाला डायबेटिस, हाय बीपी, कोलेस्टेरॉल यांसारख्या समस्या असतील तर त्या बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करा. फॅटी लिव्हर तुमच्या या समस्या वाढवू शकते, हे लक्षात घ्या.
4. हेल्दी डाएट घ्या
तुमच्या डाएटमधून रिफाइंड स्वीट आणि साखर कमी करा. डाएटमध्ये फळं, भाज्या, कडधान्यांचा समावेश करा. ज्यात लीन प्रोटिन आणि हेल्दी फॅटचा समावेश असेल.
5. अनावश्यक औषधं टाळा
स्वतःच कोणतंही औषध केमिस्टच्या दुकानातून खरेदी करून सेवन करू नका. कोणत्याही आजाराचं औषध तुम्ही घेत असाल तर त्याचा लिव्हरवर काही विपरित परिणाम होईल का, याबाबत डॉक्टरांकडून सल्ला घ्या.