Banana Tea : वजनासोबत ब्लड प्रेशरही राहातं नियंत्रित! केळीच्या चहाचे हे अद्भुत फायदे माहितीये?

Last Updated:

केळीमध्ये भरपूर पोषकतत्व असतात. तुम्हाला तात्काळ ऊर्जा हवी असल्यास केळी हे परिपूर्ण अन्न आहे. शिवाय ते खाण्यासही सोपे आहेत. म्हणूनच केळीचा वापर आता अनेक पाककृतींमध्ये केला जातो.

तुम्हाला तात्काळ ऊर्जा हवी असल्यास केळी हे परिपूर्ण अन्न आहे.
तुम्हाला तात्काळ ऊर्जा हवी असल्यास केळी हे परिपूर्ण अन्न आहे.
मुंबई, 24 ऑगस्ट : केळी मिळत नसतील असे या जगात कोणतेच ठिकाण नाही. मुंबईसारख्या ठिकाणी तर अनेकदा लोक फक्त केळी खाऊन दिवस काढतात. केळीमध्ये भरपूर पोषकतत्व असतात. तुम्हाला तात्काळ ऊर्जा हवी असल्यास केळी हे परिपूर्ण अन्न आहे. शिवाय ते खाण्यासही सोपे आहेत. म्हणूनच केळीचा वापर आता अनेक पाककृतींमध्ये केला जातो.
हल्ली चहामध्ये देखील केळीचा वापर केला जातो. होय, हल्ली केळीचा चहा खूप लोकप्रिय होत आहे. कारण हा चहा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो. आज आपण केळीचा चहा कसा बनवला जातो आणि त्याचे काय काय फायदे आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत.
असा बनवा केळीचा चहा
केळीचा चहा बनवण्यासाठी गरम पाण्यात केळी उकळून उकळून घ्या. 10 मिनिटे केळी पाण्यात उकळल्यानंतर गॅस बंद करा. नंतर हे पाणी गाळून घ्या. या हे पाणी तुम्ही असेच चहा म्हणून पिऊ शकता. याव्यतिरित हे पाणी काळ्या चहामध्ये किंवा दुधामध्ये घालूनही तुम्ही पिऊ शकता. त्यात साखर घालायची गरज नाही. कारण केळीतील गोडवा त्या चहामध्ये मिसळतो.
advertisement
केळीच्या चहाचे फायदे
काही लोक केळीच्या सालीचादेखील चहा बनवतात. केळीच्या सालीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. केळीच्या चहा प्यायल्याने तुम्हाला जास्त फायबर मिळेल. शरीराला फायबर मिळाल्यास बद्धकोष्ठता, पोट बिघडणे अशा समस्यांपासून मुक्ती मिळते.
बरेच लोक चवीसाठी केळीच्या चहामध्ये दालचिनी किंवा मध घालतात. रात्री झोपण्यापूर्वी केळीचा चहा प्यायल्यास तुम्हाला चांगली झोप लागते. तुम्हालाही झोपेचा त्रास होत असेल तर केळीचा चहा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.
advertisement
केळीचा चहा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. वजन कमी करण्याच्या प्रवासात तुम्ही केळीचा चहा देखील पिऊ शकता.
केळीचा चहा प्यायल्याने हाडे मजबूत होतात. त्यामुळे केळीचा चहा वृद्धांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. हा चहा डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. जर तुमचे डोळेही कमकुवत असतील तर तुम्ही हा चहा अवश्य सेवन करा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Banana Tea : वजनासोबत ब्लड प्रेशरही राहातं नियंत्रित! केळीच्या चहाचे हे अद्भुत फायदे माहितीये?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement