एका हाताने फोन पकडणे आणि त्याच हाताच्या अंगठ्याने त्याचा वापर करणे :
जर तुम्ही तुमचा फोन एका हाताने पकडता आणि त्याच हाताच्या अंगठ्याने तो स्क्रोल करत असाल तर यावरून तुम्ही बेफिकर आणि आत्मविश्वासू व्यक्ती आहात हे समजते. तुम्ही जीवनातील आव्हाने सहज स्वीकारता आणि नवीन संधी मिळवण्यासाठी नेहमी तयार असता. तथापि, आपण कधीकधी घाईघाईने निर्णय घेऊ शकता.
advertisement
दोन्ही हातांनी फोन पकडून एका अंगठ्याने स्क्रोल करणे :
जर तुम्ही तुमचा फोन दोन्ही हाताने पकडून एक अंगठा वापरून स्क्रोल करत असाल तर तुम्ही सावधानतेने आणि सहानुभूतीपूर्वक जीवन जगणारे व्यक्ती आहात. तुम्ही दुसऱ्यांच्या भावना जाणता तसेच धोके टाळण्याचा प्रयत्न करता. तुम्ही तुमचे निर्णय विचारपूर्वक घेता आणि इतरांसाठी आधार होता.
दोन्ही हातांनी फोन पकडून दोन्ही अंगठ्यानी स्क्रोल करणे :
जर तुम्ही तुमचा फोन दोन्ही हातांनी पकडून दोन्ही अंगठ्यांनी स्क्रीन स्क्रोल करत असाल तर तुम्ही खूप ऊर्जावान व्यक्ती आहात. तुम्ही खूप वेगाने विचार करता आणि समोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करता. तुम्ही खूप सोशल असण्यासोबत लोकांमध्ये लोकप्रिय असाल. तुम्ही कधीकधी खूप जास्त काम करण्याचा प्रयत्न करू शकता.
एका हाताने फोन पकडून अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने स्क्रीन स्क्रोल करणे :
जर तुम्ही एका हाताने फोन पकडून दुसऱ्या हाताच्या अंगठ्या जवळील बोटाने स्क्रोल करत असाल तर तुम्ही बुद्धिमान आणि नीट विचार करून निर्णय घेणारे व्यक्ती असू शकता. तुम्ही दुसऱ्यांच्या बोलण्याने लगेच प्रभावित होणारे व्यक्ती नाहीत. तुम्ही तुमच्या विचारांवर अडून राहता. तुम्ही एक चांगले नेता आणि प्रभावशाली व्यक्ती आहात.