TRENDING:

Brinjal Recipe : भरल्या वांग्याचा नवा प्रकार खवा वांगी; विचित्र कॉम्बिनेशन पण चवीला अप्रतीम

Last Updated:

Brinjal Recipe Video : खवा वांगी... नाव वाचूनच विचित्र वाटलं असेल. खवा आणि वांगी हे कॉम्बिनेशन तुम्हाला विचित्र वाटेल. पण ही खवा वांगी चवीला अप्रतीम लागतात असं सांगितलं जातं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वांग्याची तुम्ही बऱ्याच प्रकारची भाजी खाल्ली असेल. कोणत्याही कडधान्यात टाकून बनवलेलं वांगं, वांगं बटाटा आणि भरली वांगी... भरली वांगी म्हणताच अनेकांच्या तोंडाला तर पाणी सुटलं असेल. पण तीच तीच त्याच पद्धतीने भरली वांगी किती वेळा खाणार, आता भरल्या वांग्याचा हा नवा प्रकार ट्राय करून पाहा, तो म्हणजे खवा वांगी.
News18
News18
advertisement

खवा वांगी... नाव वाचूनच विचित्र वाटलं असेल. खवा आणि वांगी हे कॉम्बिनेशन तुम्हाला विचित्र वाटेल. पण ही खवा वांगी चवीला अप्रतीम लागतात असं सांगितलं जातं. आता ही खवा वांगी कशी बनवायची, त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहुयात.

Rice Recipe Video : भात खाऊन कंटाळली नातवंडं, आजीने प्रेमाने बनवले भाताचे कोंडुळे; पाहा संपूर्ण रेसिपी

advertisement

खवा वांग्यासाठी लागणारं साहित्य

वांगी - 7-8

खवा - अर्धी वाटी

आलं पेस्ट - 2 चमचे

लसूण पेस्ट - 1 चमचा

सुकं खोबरं - 2 चमचे

खसखस - 1 चमचा

आमचूर पावडर

कोथिंबीर - बारीक चिरलेली

कांदा - बारीक चिरलेला

साखर

मीठ

तेल

मोहरी

हळद

हिंग

लाल तिखट मसाला

पाणी

advertisement

खवा वांगी कशी करायची, कृती

खवा, आलं पेस्ट, लसूण पेस्ट, सुकं खोबरं, खसखस, आमचूर पावडर, कोथिंबीर, साखर, मीठ सगळं एकत्र करून घ्या. हा वांग्यात भरायचा मसाला तयार. आता भरली वांगीसाठी वांंगी चिरतो तशा पद्धतीने वांगी चिरून घ्यायची. वांग्याच्या आत देठाजवळ थोडं मीठ टाकायचं म्हणजे तो भाग खाताना अळणी लागणार नाही. तयार केलेला मसाला या वांग्यांमध्ये भरून घ्या.

advertisement

कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, बारीक चिरलेला कांदा फोडणीला द्या. कांदा नीट परतला की गॅस बंद करा. त्यात हिंद, हळद आणि तिखट, कोथिंबीर घालून परतून घ्या. आता यात भरलेली वांगी टाका. थोडं परतून घ्या. अगदी थोडं पाणी, मीठ घालून झाकण ठेवा आणि 8-10 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्या. मधे मधे झाकण काढून बघा. उरलेला मसाला या वांग्यात वरून टाका. पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्या. वांंगं शिजलं का पाहा आणि आता खायला तयार आहे खवा वांगी.

advertisement

Masteer Recipes या युट्युब चॅनेलवर शेफ विष्णू मनोहर यांनी दाखवलेली ही रेसिपी. या वांग्यात भरलेल्या मसाल्यात खवा, आलं-लसूण आहे तर बाहेरून हळद, हिंग, मसाला टाकला आहे. हे जेव्हा आपण एकत्र खातो तेव्हा ते खाण्याची गंमतच वेगळी आहे, असं ते म्हणाले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतीतून मिळतं नव्हतं उत्पन्न, शेतकऱ्याने सुरू केला दूध व्यवसाय, 6 लाखांचा नफा
सर्व पहा

तुम्ही ही खवा भरलेली वेगळ्या पद्धतीची भरली खवा वांगी करून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Brinjal Recipe : भरल्या वांग्याचा नवा प्रकार खवा वांगी; विचित्र कॉम्बिनेशन पण चवीला अप्रतीम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल