TRENDING:

Summer Drink : उन्हाळ्यात प्या हे मराठमोळं कोल्ड ड्रिंक! शेफ संजीव कपूर यांनीही दिला पिण्याचा सल्ला

Last Updated:

लिंबू सरबत, उसाचा रस, फळांचे ज्यूस हे आरोग्यासाठी चांगले मानले जातात. परंतु आणखी एक मराठमोळं पेय असं आहे जे तुम्हाला उष्णतेपासून सुरक्षित ठेवतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळा सुरू झाला आहे. राज्यभरात कुठे अवकाळी पाऊस तर कुठे कडक उन असं चित्र आहे. विदर्भात अकोल्यासह काही जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. पुढील आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांची हीच परिस्थितीत आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. उन्हापासून शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी नैसर्गिक थंड पेये कधीही उत्तम मानले जातात. लिंबू सरबत, उसाचा रस, फळांचे ज्यूस हे आरोग्यासाठी चांगले मानले जातात. परंतु आणखी एक मराठमोळं पेय असं आहे जे तुम्हाला उष्णतेपासून सुरक्षित ठेवतं आणि आरोग्यालाही अनेक प्रकारे फायदेशीर ठरतं. ते म्हणजे कोकम सरबत.
शेफ संजीव कपूर यांनी सांगितले फायदे
शेफ संजीव कपूर यांनी सांगितले फायदे
advertisement

कोकम सरबतचा आगळ तुम्हाला बाजारत देखील मिळून पण तुम्ही ते खरी देखील बनवू शकता. ते घरी बनवणं अतिशय सोपं आहे आणि घरी बनवल्यानंतर ते अधिक आरोग्यदायी देखील असतं. कारण त्यात कोणतेही प्रिझरव्हेटिव्ह देखील नसतात. उन्हाळ्यात तुमचं शरीर थंड ठेवण्यासाठी हे सरबत अतिशय उपयुक्त मानलं जातं.

कोकम सरबत बनवण्यासाठी साहित्य?

कोकम सरबत बनवणं अगदी सोपं आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य देखील तुमच्याकडे सहज उपलब्ध होऊ शकते. यासाठी तुम्हाला एक वाटी कोकम, अर्धी वाटी गूळ, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड, एक चमचा सब्जा, अर्धा चमचा काळं मीठ, पाव चमचा काळी मिरी आणि अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड हे साहित्य तयार ठेवा.

advertisement

कोकम सरबत कसं बनवावं?

कोकम सरबत बनवण्यासाठी सर्वात आधीत वाटीभर कोकम फळं घेऊन ते व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर त्यातल्या बिया काढून टाका. यानंतर त्यात एक वाटी गरम पाणी घाला आणि अर्धा तास भिजवून ठेवा. यानंतर ते मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्या. आता एका कढईत अर्धी वाटी गूळ घ्या आणि त्यात अर्धी वाटी पाणी घाला. गूळ पाण्यात पूर्ण विरघळेपर्यंत हलवा. यानंतर त्यात मिक्सरमध्ये वाटून तयार केलेली कोकमची पेस्ट घाला. त्याला मंद आचेवर पाच मिनिटांपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता त्यात अर्धा चमचा काळं मीठ, पाव चमचा काळी मिरी आणि अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड घालून चांगलं मिक्स करा. आता एका गाळणीने ते एका भांड्यात व्यवस्थित गाळून घ्या.

advertisement

सरबत बनवण्याचा पुढील टप्पा

यानंतर एक चमचा सब्जा एका वाटीत घेवून त्यात अर्धी वाटी पाणी घाला आणि ते 45 मिनिटे भिजत ठेवा. सब्जा व्यवस्थित भिजल्यानंतर आता तुम्ही सरबत तयार करायला घेऊ शकता. सरबत तयार करण्यासाठी एका ग्लासात बर्फाचे तीन ते चार तुकडे घ्या. त्यात एक मोठा चमचा कोकम सरबत घाला आणि तुम्हाला हवं असेल त्या प्रमाणात पाणी घाला. आता त्यात भिजवलेला सब्जा घाला. तुमचं चविष्ट आणि थंडगार कोकम सरबत तयार आहे. आता तुम्ही त्याचा छान फॅमिलीसोबत बसून आनंद घेऊ शकता.

advertisement

शेफ संजीव कपूर यांनी सांगितले फायदे

शेफ संजीव कपूर यांनी देखील कोकमचे फायदे सांगितले आहेत. संजीव कपूर यांच्या मते, कोकम वजन कमी करण्यासाठी आणि पचनासाठी अतिशय उत्तम आहे. तसेच शरीराला थंडवा देणारे गुणधर्म त्यात असतात असेही ते म्हणाले. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तुम्हाला पचनाच्या समस्या असतील किंवा उन्हाळ्यात तुम्हाला थंड पेय हवं असेल तर तुम्ही कोकम सरबत पिऊ शकता. तुम्ही कोणताही पदार्थ आंबट करण्यासाठी त्यात कोकम घालू शकता, असेही संजीव कपूर यांनी सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात इलेक्ट्रिक वाहनं वापरताना हा असतो मोठा धोका, एक्सपर्टचा महत्त्वाचा सल्ला
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Summer Drink : उन्हाळ्यात प्या हे मराठमोळं कोल्ड ड्रिंक! शेफ संजीव कपूर यांनीही दिला पिण्याचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल