अमरावती - अमरावतीमधील प्रसिद्ध असलेले रघुवीर मिठाई प्रतिष्ठान, यांच्याकडून दरवर्षी दिवाळीला ग्राहकांसाठी युनिक अशी मिठाई तयार केली जाते. यावर्षी सुद्धा त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. 2024 च्या दिवाळी पर्वावर रघुवीर मिठाई प्रतिष्ठान यांनी सोनेरी भोग नाव असलेली मिठाई तयार केली आहे. या मिठाईची किंमत 14 हजार रुपये प्रति किलो इतकी आहे.
advertisement
ही मिठाई 24 कॅरेट सोन्याच्या अर्कापासून बनवण्यात आली आहे. अमरावतीमध्ये सध्या या मिठाईची जोरदार चर्चा आहे. याचनिमित्ताने रघुवीर मिठाई प्रतिष्ठानचे संचालक दिलीप पोपट यांचे सुपुत्र प्रितेश पोपट यांच्याशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, आम्ही दरवर्षी अशाप्रकारच्या मिठाई ग्राहकांसाठी तयार करत असतो. या वर्षी सोनेरी भोग ही मिठाई आम्ही तयार केली आहे. याची किंमत 14 हजार रुपये प्रति किलो इतकी ठेवली आहे. कारण यावर्षी सोन्याचे भाव सुद्धा वाढले आहे.
मोबाईलमुळे होऊ शकतं मोठं नुकसान, अजिबात करू नका ही चूक, पोलिसांनीच सांगितलं...
सोनेरी भोगमध्ये कोणकोणत्या वस्तू वापरल्या गेल्यात?
सोनेरी भोग ही मिठाई राजस्थानच्या स्पेशल कारागिरांनी बनवली आहे. यात मामरा बदाम, पिस्ता, शुध्द केसर, काजू या सर्व वस्तू वापरण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याचा अर्क यावर लावण्यात आलेला आहे. दरवर्षी आम्ही हे प्रयोग करतो आणि ते यशस्वी होतात. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीमातेला भोग लावता येईल, या दृष्टिकोनातून या मिठाईचे नाव सोनेरी भोग ठेवले आहे.
सोनेरी भोग कुठे उपलब्ध आहेत?
ही मिठाई रघुवीर प्रतिष्ठानच्या अमरावतीमधील प्रत्येक शाखेत उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सांगली आणि मिरज येथील शाखेत सुद्धा उपलब्ध आहे. दिवाळीनिमित्त मिठाईसाठी स्पेशल बॉक्स दिल्ली, मुंबईहून बोलवण्यात आले आहे. तसेच यावर आकर्षक गिफ्ट हॅम्पर्ससुद्धा उपलब्ध आहेत.
सोनेरी भोगसाठी परदेशातून मागणी -
कार्पोरेट सेक्टरसाठी सुद्धा त्यांनी नवनवीन आयडिया वापरून गिफ्ट हॅम्पर्स तयार केले आहेत. त्याची ऑर्डर घेतल्या जात आहेत. सोनेरी भोग मिठाईला अमरावती, नागपूर, मुंबई, पुणे, दिल्ली आणि अमेरिकेतून सुद्धा मागणी असल्याची माहिती त्यांनी दिली.