तुम्हाला लोणचं खायला आवडत असेल आणि तिखटही खात असाल तर तुम्ही हे हिरव्या मिरचीचं इन्स्टंट लोणचं बनवायलाच हवं. हे लोणचं काही मिनिटात बनतं. तुम्ही ते लगेच खाऊ शकता आणि 2-3 दिवस मुरल्यानंतर तर या लोणच्याची चव आणखी वाढते. इंस्टाग्रामवर prasika_official या काऊंटवर ही रेसिपी दिली गेली आहे. चला पाहूया हिरव्या मिरचीचं इन्स्टंट लोणचं कसं बनवायचं.
advertisement
हिरव्या मिरचीचं इन्स्टंट लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- हिरवी मिरची
- लसूण
- व्हिनेगर
- काळी मोहरी
- पिवळी मोहरी
- काळी मिरी
- बडीशेप
- मेथी दाणे
- लाल तिखट
- धणे
- जिरे
- तेल
- मीठ
- हिंग
- हळद
हिरव्या मिरचीचं इन्स्टंट लोणचं बनवण्याची पद्धत..
- सर्वात आधी लांब हलक्या हिरव्या रंगाच्या मिरच्या घ्या, त्या अति तिखट नसतात.
- आता या मिरच्या स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्या आणि कापडावर टाकून व्यवस्थित कोरड्या करा.
- आता गॅसवर एक कढई ठेवा आणि गॅस चालू करा.
- या कढईमध्ये बडीशेप, मेथीचे दाणे, धणे, जिरे, काळी मोहरी, पिवळी मोहरी आणि काळी मिरी हे सर्व टाकून कोरडेच भाजून घ्या.
- भाजून झाल्यनानंतर हे सर्व थंडहिण्यासाटी एका प्लेटमध्ये बाजूला ठेवा.
- आता एका चॉपरमध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या आणि लसूण टाका. त्यापूर्वी मिरचीची देठं काढा.
- या मिरच्या चॉपरमध्ये फिरवा. मात्र मिरच्या जास्त बारीक करू नका.
- तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडीच्या मापात मिरच्या कापूनदेखील घेऊ शकता.
- आता भाजलेला मसाला मिक्सरला थोडा जाडा भरडा वाटून घ्या. मसाला जास्त बारीकही नसावा आणि जास्त जाडही नाही.
- आता मिरच्या एका बाऊलमध्ये घ्या आणि त्यामध्ये हा मसाला टाका.
- त्यानंतर या मसाल्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकून व्यवस्थित मिसळून घ्या.
- आता गॅसवर कढई ठेवा आणि त्यामध्ये तेल गरम करा.
- या तेलामध्ये हिंग आणि हळद टाका.
- मिरचीच्या मिश्रणात आधी थोडे व्हाईट व्हिनेगर टाका आणि त्यानंतर हे तेल टाकून पून्हा मिसळा.
तर अशाप्रकारे तुमचं हिरव्या मिरचीचं इन्स्टंट लोणचं तयार आहे. हे लॉन्च तुम्ही वरण भात किंवा अगदी भाकरीसोबतही खाऊ शकता. याने तुमच्या जेवणाला आणखी छान चव मिळेल. तिखट खाणाऱ्यांसाठी तर हा बेस्ट पदार्थ आहे. मग एकदा नक्की ट्राय करा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
