जालना : आपल्या देशामध्ये मिळणार स्ट्रीट फूड हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. उत्तर भारतातून महाराष्ट्रात आलेली पाणीपुरी देखील अतिशय लोकप्रिय झाली असून अनेकांना हा पदार्थ अतिशय आवडतो. जालना शहरात मिळणारी जय संताजी पाणीपुरी खाण्यासाठी खवय्यांची इथे नेहमीच गर्दी पाहायला मिळते. उडीद, मूग डाळीपासून तयार केलेल्या पाणीपुऱ्या आणि अतिशय चविष्ट असलेलं पाणीपुरीतील पाणी यामुळे ग्राहकांची या पाणीपुरीला पहिली पसंती असते.
advertisement
कधी सुरु केला व्यवसाय?
जालना शहरातील मोदीखाना परिसरात राहणारे काशिनाथ गवळी हे मागील 17 वर्षांपासून पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतात. सुरुवातीला या व्यवसायात नवीन असताना ते गल्लोगल्ली फिरून पाणीपुरीची विक्री करायचे तेव्हा केवळ 200 ते 250 रुपयांचा व्यवसाय दिवसाला व्हायचा. मात्र, या व्यवसायातील बारकावे लक्षात आल्यानंतर उत्कृष्ट दर्जाची पाणीपुरी ते आता ग्राहकांना सर्व्ह करत आहेत. यामुळे खवय्यांची देखील त्यांच्या पाणीपुरी स्टॉलवर मोठी झुंबड असल्याचं पाहायला मिळतं.
शेगाव कचोरी खावी तर इथंच, 5 रुपयात भरेल पोट, जालन्यातील तरुण करतोय विक्री
कशी बनवली जाते पाणीपुरी?
रवा, उडीद आणि मूग डाळीपासून ते पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्या तयार करतात. त्याचबरोबर पाणीपुरीसाठी असलेलं पाणी हे अतिशय शुद्ध म्हणजेच आरो फिल्टर केलेलं पाणी असते. यामध्ये मिरची, जिरे, अद्रक, कोथिंबीर, पुदिना, इलायची, लौंग, साजिरा इत्यादी मसाले घालून तयार केले जाते. यामुळे या पाण्याला अत्यंत उत्कृष्ट चव येते. या पाणीपुरी स्टॉलवर दररोज साडेचारशे ते पाचशे ग्राहक पाणीपुरीचा आस्वाद घेतात. दररोज साडेतीन हजार पुऱ्यांची विक्री होते. दिवसाला साडेसहा ते आठ हजारांचा व्यवसाय होतो. यातून दोन ते अडीच हजार निव्वळ नफा होतो. तर लग्नसराईच्या हंगामामध्ये लग्नाच्या आलेल्या ऑर्डरमधून अडीच ते तीन महिन्यांच्या सीझनमध्ये तीन ते साडेतीन लाखांच उत्पन्न काशिनाथ गवळी यांना मिळते.
उसळपासून ते कोबी थालीपीठ, एकाच ठिकाणी कोल्हापुरात मिळतायत तब्बल 13 प्रकार, खायला असते गर्दी
मागील 17 वर्षांपासून या हा व्यवसाय करतोय. सर्वांना भाऊ, दादा म्हणून व्यवसाय केल्याने व्यवसाय वृद्धी होते. स्वच्छता, पाणीपुरीची वेगळी चव यामुळे ग्राहक आपल्याकडे भरपूर प्रमाणात येतात. लग्न सराईच्या सीजनमध्ये ही चांगला व्यवसाय होतो. शहरातून लांबून लांबून लोक इथे येतात तसेच गाव खेड्यातील लोक देखील आवर्जून पाणीपुरी खाण्यासाठी माझ्याकडे येतात. दिवसाला दोन ते अडीच हजारांचा नफा व्यवसायातून होतो, असं काशिनाथ गवळी यांनी सांगितलं.