या व्यवसायाची सुरुवात शेखर अग्रवाल यांच्या आजोबांनी केली होती. काळानुरूप अनेक बदल झाले, परंतु चव आणि गुणवत्ता मात्र आजही तशीच राखली गेली आहे. सध्या चौथी पिढी हा व्यवसाय सांभाळत असून, जुन्या परंपरेसोबत आधुनिक काळाशी सुसंगत सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जुन्या काळात केवळ एका आण्याला मिळणारी पाणीपुरी आज 30 रुपयांना मिळते मात्र ग्राहकांच्या मते, चवीत अजिबात फरक पडलेला नाही.
advertisement
Success Story : निर्णयावर ठाम राहिले, 67 व्या वर्षी सुरू केला व्यवसाय, अच्युतराव यांच्या यशाची कहाणी
कमल नारायण येथे केवळ पाणीपुरीच नव्हे, तर रगडापुरी, चाट, भेळ, शेवपापडी असे विविध चविष्ट पदार्थही उपलब्ध आहेत. त्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील ग्राहक येथे हमखास भेट देतात. अनेक जुने ग्राहक आजही आपल्या कुटुंबीयांसह येथे येत असल्याने हे ठिकाण पिढ्यान्पिढ्यांचे आवडते बनले आहे.
या दुकानाबाबत माहिती देताना शेखर अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही 115 वर्षांपासून तीच पारंपरिक चव जपण्याचा प्रयत्न करत आहोत. ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम यामुळेच हा व्यवसाय आजही तितक्याच यशस्वीपणे सुरू आहे. पुण्याच्या खाद्यपरंपरेतील हा अनमोल वारसा आजही चवीने जिवंत आहे.





