ठाण्याचे इंटरनेिट मॉल जवळील पिरसरात असलेल्या या फुड ट्रकचे नाव गुल्लू अंडेवाला असे आहे. या फूड ट्रकचे मालक वेद रवळेकर आहेत. सहा महिन्याचा कमी कालावधीत आपल्या चवीमुळे प्रिसद्ध झालेल्या ह्या खिमा घोटाळ्याला खवय्यांची येथे अधिक मागणी आहे.
धाराशिवच्या प्रसिद्ध गुलाबजामची बातच न्यारी; एकदा खाल तर प्रेमात पडाल, Video
advertisement
खिमा घोटाळा कसा तयार होतो?
नॉनव्हेज बरोबरच एगीटेरियन खवय्यांच्या पसंतीची ही खिमा घोटाळा डिश चिकन खिमा आणि अंड्यांचे एक युनिक फ्युजन आहे. अतिशय सोपी अशी असलेली डिश तुम्ही घरी देखील तयारी करू शकतात. सर्वप्रथम चिकनचा खिमा तयार करून घ्यावा. त्यानंतर कढईत थोडे तेल घेऊन त्यात थोडा तयार खिमा घ्यावा. चिकन खिमा मध्ये दोन अंडी फोडून टाकावीत. गॅस मध्यम आचेवर ठेवून त्या मिश्रणाला अगदी भुर्जीप्रमाणे एकत्र करून घ्यावे.
जसजशी वाढते गुलाबी थंडी, तसतशी मिळते 'या' मिठाईला पसंती
मिश्रणाला आणखीन फ्लेवर येण्यासाठी त्यात वरून थोडे तेल घालून त्यात मीठ, हळद, तिखट घालून पुन्हा एकजीव करून घ्यावे. तयार खिमा घोटाळा कोथिंबीर टाकून प्लेटवर कांदा आणि गरम पावा बरोबर सर्व्ह करावे. अशा प्रकारे चिकन खिमा घोटाळा खाण्यासाठी तयार होतो. खिमा घोटाळ्याची किंमत 100 रुपये आहे, अशी माहिती वेद रवळेकर यांनी दिली आहे.