Chicken : बहुतेक जण लेगपीसवर ताव मारतात, पण चिकनचा सगळ्यात पौष्टीक भाग कोणता माहितीये?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chicken Healthy Part : चिकनचा कोणता भाग सगळ्यात जास्त पौष्टीक असतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे. कारण चिकनच्या प्रत्येक भागातील पोषणमूल्य वेगवेगळं असतं.
चिकन म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. रविवार आणि नंतर थर्टी फर्स्ट पार्टीला चिकनचा बेत आहे. चिकन म्हटलं की बहुतेक जण लेगपीसवर ताव मारतात. लेगपीस आवडीने खातात. पण चिकनचा कोणता भाग सगळ्यात जास्त पौष्टीक असतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे. कारण चिकनच्या प्रत्येक भागातील पोषणमूल्य वेगवेगळं असतं.
advertisement
चिकन लिव्हर किंवा काळीज, कलेजी हा सर्वात जास्त पोषणमूल्य असलेला भाग मानला जातो. यामध्ये आयर्न, व्हिटॅमिन A, B12 प्रचंड प्रमाणात असतं. रक्तवाढीसाठी आणि अशक्तपणावर लिव्हर उपयोगी ठरतो. मात्र यामध्ये कोलेस्टेरॉल आणि काही जीवनसत्त्वं जास्त असल्यामुळे आठवड्यातून 1–2 वेळाच खाणं आरोग्यास योग्य मानलं जातं.
advertisement
advertisement
advertisement
चिकन ब्रेस्ट म्हणजे छातीचा भाग हा सर्वात पौष्टीक आणि हेल्दी मानला जातो. याचं मुख्य कारण म्हणजे यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आणि फॅट अत्यंत कमी असतं. त्यामुळे हा भाग पचनास हलका असून शरीराला आवश्यक असलेले अमिनो अ‍ॅसिड्स पुरवतो. वजन कमी करायचं असेल, जिम करत असाल, डायबेटीस किंवा हृदयविकाराचा धोका असेल तर चिकन ब्रेस्ट सर्वोत्तम पर्याय ठरतो. उकडलेलं, ग्रिल केलेलं किंवा कमी तेलात शिजवलेलं ब्रेस्ट खाल्ल्यास त्याची पौष्टिकता टिकून राहते.
advertisement
advertisement











