advertisement

Mumbai News : पालकांचे निधन ,कामासाठी मुंबईत आली अन् अनाथ तरुणीसोबत मोठा घात झाला

Last Updated:

Mumbai Crime News : मुंबई शहरातून एका तरुणीसोबत भयंकर प्रकार घडलेला आहे. जिथे नवीन कामाची स्वप्न पाहणाऱ्या तरुणीसोबत असं काय होत ज्याने हा प्रकार घडलेला आहे.

News18
News18
मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने 17 वर्षीय निराधार मुलीवर चाकूने हल्ला केला. ही घटना 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली. एका सामाजिक संस्थेमुळे हा प्रकार समोर आला असून घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
पोरक्या मुलीच्या स्वप्नांची मुंबईत राखरांगोळी
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी मुलीचे आई-वडील 2011 मध्ये वारले. त्यानंतर ती काही वर्षे नातेवाईकांकडे आणि काही वर्षे अनाथाश्रमात राहिली. त्यातच तिने शिक्षण घेत असतानाच तिने ब्युटीपार्लरचा कोर्स पूर्ण केला होता. मग अखेर त्यानंतर नोकरीच्या शोधात ती मुंबईत आली मात्र शहरात कोणी ओळखीचे नसल्याने तिने दोन दिवस रेल्वे स्थानकात काढले.
advertisement
दरम्यान त्या वेळी सतीश शिंदे असे नाव सांगणाऱ्या एका तरुणाने तिला मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याने तिचा विश्वास संपादन करून आधी साकीनाका येथील लॉजमध्ये आणि नंतर घाटकोपरमधील रामजीनगर भागात राहण्याची सोय केली.
नकार मिळताच सैतानी अवतार दाखवला
5 फेब्रुवारीच्या रात्री सतीश तिला भेटण्यासाठी गेला आणि तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण मुलीने नकार दिल्यानंतर तो संतापला आणि स्वयंपाकघरातील चाकूने तिच्यावर वार केले. जखमी अवस्थेत तिला जावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर  उपचारानंतर आशा सदन या संस्थेने तिला आधार दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : पालकांचे निधन ,कामासाठी मुंबईत आली अन् अनाथ तरुणीसोबत मोठा घात झाला
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement