साहित्य-
- पनीर – 200 ग्रॅम (चौकोनी तुकडे)
- कॉर्नफ्लोअर – 2 टेबलस्पून
- पाणी – गरजेनुसार
- तेल – तळण्यासाठी
ग्रेव्हीसाठी-
- तेल – 2 टेबलस्पून
- लसूण – 1 टेबलस्पून (बारीक चिरलेला)
- हिरवी मिरची – 1–2 (चिरलेली)
- कांदा – 1 मध्यम (चौकोनी कापलेला)
- शिमला मिरची – 1 (चौकोनी कापलेली)
- सोया सॉस – 1 टेबलस्पून
- चिली सॉस – 1 टेबलस्पून
- टोमॅटो केचप – 1 टेबलस्पून
- मीठ – चवीनुसार
- कॉर्नफ्लोअर – 1 टीस्पून
- पाणी – ½ कप
- स्प्रिंग अनियन – सजावटीसाठी
advertisement
1)पनीर तळणे-
- एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर, मीठ घाला आणि मिक्स करून घ्या.
- मग पनीरचे तुकडे गरम तेलात गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या. बाजूला ठेवा.
advertisement
2)ग्रेव्ही तयार करणे-
- कढईत तेल गरम करून त्यात लसूण व हिरवी मिरची परतून घ्या.
- कांदा आणि शिमला मिरची घालून 1- 2 मिनिटे हाय फ्लेमवर परतावे (कुरकुरीत राहू द्या).
- आता सोया सॉस, चिली सॉस, केचप व मीठ घाला.
- कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून ग्रेव्हीत घाला व ढवळा.
3)पनीर मिसळणे-
advertisement
- तळलेले पनीर ग्रेव्हीत घालून 1–2 मिनिटे हलके ढवळा.
- वरून स्प्रिंग अनियन घालून गॅस बंद करा.
टिप्स-
ड्राय पनीर चिली हवी असल्यास पाणी कमी वापरा.
जास्त रेस्टॉरंट स्टाईल टेस्टसाठी हाय फ्लेमवरच शिजवा.
पनीर सॉफ्ट ठेवण्यासाठी तळण्याआधी कोमट पाण्यात 10 मिनिटे ठेवा.
गरमागरम Paneer Chilli तयार!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 3:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Paneer Chilli Recipe: थर्टी फस्टला घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली, हॉटेलची टेस्टही विसराल