मुंबई : मलई पेढे, बर्फी, मिठाई, शुद्ध तूप आणि दही हे दुग्धजन्य पदार्थ सर्वांच्याच आवडीचे आहेत. हे पदार्थ जिथे शुद्ध मिळतात त्या ठिकाणी तर लोकांची गर्दीच होते. दादरकरांची अशीच गर्दी दादर स्थानकासमोर असणाऱ्या सामंत ब्रदर्स या मिठाईच्या दुकानासमोर होते. सामंत ब्रदर्स हे मिठाईचे दुकान गेले 91 वर्ष म्हणजेच 1933 पासून दादरमध्ये आपले शुध्द तूप, लस्सी आणि मिठाईसाठी प्रसिद्ध आहे. सामंत ब्रदर्स यांच्या दुकानात मिळणारे पियुष हे पेय दादरकरांचे सर्वात आवडीचे पेय आहे. इथे हे पिण्याकरिता अनेकांची गर्दी होते.
advertisement
कोणी केली दुकानाची सुरुवात?
सामंत ब्रदर्स हे दुकान सदाशिव गोविंद सामंत यांनी 1933 साली दादरमध्ये सुरू केले. सुरुवातीला छोटं असणार हे दुकान हळू हळू भरभराटीस आले. आता या दुकानाच्या गिरगाव, पार्ले आणि ठाण्यात अशा तीन शाखा आहेत. सध्या हे दुकान तिसऱ्या पिढीतील रोहन सामंत हे सांभाळत आहेत.
पेट्रोल पंपावरील कामगार कसा बनला उद्योजक? सोलापुरी चटणीला परदेशातून मागणी
या मिठाईच्या दुकानाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या दुकानात विकल्या जाणाऱ्या तूप, मिठाई, पेय हे सर्व इतर कोणाकडूनही न आणता ते स्वतःच बनवतात. त्यामुळेच दादरकरांचा अजूनही त्यांच्या मिठाईवर विश्वास आहे. सामंत ब्रदर्स यांच्या दुकानात पेढ्यांचे देखील अनेक प्रकार मिळतात. ज्यामध्ये स्पेशल पिस्ता पेढा, केशर मलई पेढा, कंदी पेढा, कुंदा पेढा, मावा बर्फी, केशर बर्फी या सर्वांचा समावेश होतो.
विश्वासामुळे दादरमध्ये आमचं स्थान टिकवून
'आमच्या दुकानांमध्ये मिळणाऱ्या पदार्थांमध्ये कोणतेही केमिकल वापरले जात नाहीत आणि त्यामुळेच गिऱ्हाईकांचा आमच्यावर फार विश्वास आहे. याच विश्वासामुळे गेले वर्ष आम्ही दादरमध्ये आमचं स्थान टिकवून आहोत 'असे सामंत ब्रदर्स या दुकानाचे दुकानदार रोहन सामंत यांनी सांगितले.