सोशल मीडियावर काळा डोसाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. माहितीनुसार नागपुरातील एका हॉटेलमध्ये हा ब्लॅक डोसा मिळतो. काळा डोसा म्हणजे तुम्हाला डोसा करपवत असतील असं वाटतं असेल. पण तसं बिलकुल नाही. आता डोसा करपवला तर तो कडू लागणार आणि काळा होण्याइतपत डोसा करपवून तो खाण्यायोग्यही राहणार नाही. मग काळा डोसा बनवायचा कसा?
advertisement
आम्ही काळा डोशाची रेसिपी इंटरनेटवर सर्च करून तुमच्यासाठी आणली आहे. सामान्य डोशाच्या पिठात एक एक सीक्रेट इंग्रेडिएंट टाकायचा आहे, ज्यामुळे हा ब्लॅक डोसा तयार होतो. आता तो इंग्रिडिएंट काय आहे ते पाहुयात.
1 कप डोशाच्या पिठाच्या प्रमाणानुसार ही रेसिपी पाहू. 1 कप डोशाचं पीठ बनवण्यासाठी अर्धा कप उडीद डाळ, दीड कप तांदूळ, एक टिस्पून मेथी आणि मीठ घ्या. सगळं भिजवून, वाटून आंबवून पीठ तयार करा. हे झालं सामान्य डोशाचं पांढरंशुभ्र पीठ तयार. आता याचा काळा डोसा कसा बनवणार, तर यात या डोशाच्या पिठात तुम्हाला टाकायचं आहे, अक्टिवेटेड कार्बन. 2 कप डोसा पिठासाठी 1 टेबलस्पून अॅक्टिवेटेड कार्बन टाकून ते नीट मिक्स करून घ्या. त्यानंतर जसं सामान्यपणे डोसा बनवला जातो, तसाच तो बनवा. साधा डोसा, मसाला टाकून मसाला डोसा आणि डोशाचे इतर प्रकार.
Kheer Recipe Video : फोडणीची खीर! वाचून विचित्र वाटेल, पण चवीला एकदम टेस्टी
ज्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तिथं अॅक्टिवेटेड कार्बनचे फायदेही सांगण्यात आले आहेत. यामध्ये अँटिव्हायरल, अँटिबॅक्टेरिअल, अँटिफंगल, डिटॉक्सिफाइंग घटक असतात. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, नको असलेले विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यात किडनीच्या कार्यात मदत होते, असं या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे.
तुम्ही कधी हा काळा डोसा पाहिला किंवा खाल्ला आहे का? तर कसा वाटला? आणि नाही खाल्ला तर तुम्हाला हा डोसा खायला आवडेल का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
