TRENDING:

Diwali 2025 : 38 वर्षांची परंपरा, सगळ्यात स्वस्त दिवाळी फराळ, पुण्यात लाडू-चिवडा विक्रीचा उपक्रम

Last Updated:

दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि गोडव्याचा उत्सव. या गोडव्याला अधिक गोड बनवण्यासाठी दि पूना मर्चंटस् चेंबरचा पारंपरिक आणि लोकप्रिय लाडू-चिवडा विक्री उपक्रम यंदा 38 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि गोडव्याचा उत्सव. या गोडव्याला अधिक गोड बनवण्यासाठी दि पूना मर्चंटस् चेंबरचा पारंपरिक आणि लोकप्रिय लाडू-चिवडा विक्री उपक्रम यंदा 38 व्या वर्षात पदार्पण करत आहे. उच्च दर्जा, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारी या तिन्ही गोष्टींचे उत्तम मिश्रण असलेला हा उपक्रम आता पुणेकरांच्या दिवाळीचा अविभाज्य भाग बनला आहे.
advertisement

दि पूना मर्चंटस् चेंबरने दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमांतर्गत 2 ते 2.5 लाख लाडू तयार केले जात असून 750 महिला आणि 150 आचारी 24 तास काम करत आहेत. सर्व प्रक्रिया पूर्णपणे स्वच्छ, हायजीनिक पद्धतीने केली जाते. कामगार महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाते, ज्यामुळे गुणवत्तेबरोबरच त्यांचा आरोग्यदृष्ट्याही विचार केला जातो.

advertisement

Diwali Recipe: दिवाळीसाठी बनवा खास चॉकलेट बॉन्टी, रेसिपी अशी सगळे बोटं चाखत बसतील!

या वर्षी पुण्यातील 23 विक्री केंद्रांद्वारे लाडू आणि चिवडा विक्रीसाठी उपलब्ध असतील. पुण्याच्या चारही दिशांना म्हणजेच पिंपरी-चिंचवड, बाणेर, आकुर्डी आणि शहरातील इतर ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ग्राहकांना एक किलोचा दर 190 रुपये आणि अर्धा किलोचा दर 100 रुपये ठेवण्यात आला आहे. हा उपक्रम 21 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या प्रमाणावर ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

advertisement

या उपक्रमाची सुरुवात आजपासून 38 वर्षांपूर्वी झाली. तत्कालीन कलेक्टर श्रीनिवास यांनी अन्नधान्याच्या टंचाईच्या काळात काहीतरी नवीन उपक्रम सुरू करा असा सल्ला दिला होता. त्यानुसार पूना मर्चंटस् चेंबरला साखर उपलब्ध करून देत लाडू-चिवड्याच्या विक्रीची सुरुवात केली. त्या काळात केवळ उपजीविकेचा एक मार्ग म्हणून सुरू झालेला हा उपक्रम आज पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग बनला आहे.

advertisement

या उपक्रमाची नोंद लिम्का, गिनीज आणि लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली असून, उद्घाटनप्रसंगी या नोंदीचा सन्मान प्रमाणपत्राद्वारे करण्यात आला आहे. हा एक सामाजिक उपक्रम असल्याचे दि पूना मर्चंटस् चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी सांगितले.

सामाजिक जबाबदारीच्या अंगाने विचार करता, यंदाही सीमेवरील जवानांना लाडू-चिवड्याचे पॅकेट मदतीच्या स्वरूपात दिले जाणार आहेत. याशिवाय मराठवाडा भागातील लोकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून सुमारे पाच हजार लाडू आणि चिवड्याची पॅकेट पाठवण्यात येणार आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
38 वर्षांची परंपरा,सगळ्यात स्वस्त दिवाळी फराळ,पुण्यात लाडू-चिवडा विक्रीचा उपक्रम
सर्व पहा

चोरबेले यांनी सांगितले की, हा उपक्रम केवळ विक्रीपुरता मर्यादित नाही. हे पुण्याच्या समाजमनात रुजलेले एक प्रतीक आहे. प्रत्येक वर्षी या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळतो, त्यांना आत्मनिर्भरतेचा मार्ग मिळतो आणि एकाच वेळी पुणेकरांना दर्जेदार फराळ मिळतो. समाजासाठी काहीतरी करण्याची संधी मिळते, हेच या उपक्रमाचे खरे यश आहे. 38 वर्षांचा वारसा आणि हजारो हातांनी साकारलेला हा गोडवा यंदाही पुणेकरांच्या दिवाळीला खास गोड करणारा आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Diwali 2025 : 38 वर्षांची परंपरा, सगळ्यात स्वस्त दिवाळी फराळ, पुण्यात लाडू-चिवडा विक्रीचा उपक्रम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल