Diwali Recipe: दिवाळीसाठी बनवा खास चॉकलेट बॉन्टी, रेसिपी अशी सगळे बोटं चाखत बसतील!
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Diwali Recipe: दिवाळीसाठी घरोघरी खास डिश बनवल्या जातात. तुम्ही देखील हटके बनवण्याचा विचार करत असाल तर चॉकलेट बॉन्टी रेसिपी उत्तम पर्याय आहे.
छत्रपती संभाजीनगर : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीये. दिवाळीसाठी घरोघरी गोड-धोड पदार्थ केले जातात. पण तेच ते पारंपारिक पदार्थ करण्यापेक्षा तुम्हाला काही वेगळे आणि हटके करायचे असेल तर तुम्ही खास चॉकलेट बॉन्टी बनवू शकता. छत्रपती संभाजीनगरमधील ऋतुजा पाटील यांनी ही खास रेसिपी लोकल18 सोबत बोलताना सांगितली आहे.
'चॉकलेट बॉन्टी'साठी लागणारे साहित्य
डेसिकेटेड कोकोनट, मिल्कमेड ( कंडेन्स मिल्क ) व्हॅनिला इसेन्स, डार्क चॉकलेट, दूध, डेकोरेशनसाठी कलरफुल बॉल एवढंच साहित्य याकरता लागणार आहे.
चॉकलेट बॉन्टी कृती
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये डेसिकेटेड कोकोनट घ्या. त्यामध्ये तुमच्या चवीप्रमाणे कंडेन्स मिल्क टाका. तीन ते चार ड्रॉप व्हॅनिला इसेन्स आणि एक ते दीड चमचा दूध हे सर्व टाकून झाल्यानंतर एकजीव करून घ्यायचं. सर्व मिश्रण नीट एकजीव झाल्यानंतर त्याला आकार द्यायचा आहे. तुम्ही कुठलाही प्रकारचा आकार त्याला देऊ शकता. या ठिकाणी चौकोनी आकार दिला आहे आणि आकार देऊन झाल्यानंतर हे सेट होण्याकरता एक तास फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत.
advertisement
एक तास फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर डार्क चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे सर्व तयार झालेले चॉकलेट बॉन्टी डीप करून घ्यायचे. सर्व चॉकलेट बॉन्टी डीप झाल्यानंतर परत एक पाच ते दहा मिनिटे फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं. आता चॉकलेट बॉन्टी सेट झालेले आहेत. गार्निशिंगसाठी वरतून थोडसं डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आणि कलरफुल चॉकलेटचे बॉल त्यावरती टाकायचे.
advertisement
अशा पद्धतीने ही चॉकलेट बॉन्टी झटपट तयार होते. तुम्ही देखील घरी दिवाळीसाठी नक्की ट्राय करू शकता.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Oct 15, 2025 12:11 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Diwali Recipe: दिवाळीसाठी बनवा खास चॉकलेट बॉन्टी, रेसिपी अशी सगळे बोटं चाखत बसतील!




