TRENDING:

26 वर्षांची परंपरा, महाराष्ट्रातलं असं हे पेढ्यांचं गाव, हा पेढा लवकर होत नाही खराब, Video

Last Updated:

अमरावती मधील पूर्णानगर हे गाव पेढ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावातील जास्तीत जास्त लोक पेढ्यांचा व्यवसाय करतात. येथील पेढे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
advertisement

अमरावती : अमरावतीवरून 26 किलोमीटर अंतरावर पुर्णानगर हे पेढ्यांच गाव आहे. पेढ्यांचं गाव म्हणजे नक्की काय? तर या गावा तील जास्तीत जास्त लोकं पेढ्यांचा व्यवसाय करतात. या गावातील मुख्य व्यवसाय शेती हा आहे. मात्र, शेतीमध्ये सतत नुकसान होत असल्याने तेथील एका व्यक्तीने 26 वर्षांआधी हा व्यवसाय सुरू केला. आता त्या गावातील 15 ते 16 तरुण हा व्यवसाय करीत आहे. फक्त दूध आणि कमीत कमी साखर वापरून पेढा बनवला जातो. त्यात कोणतेही केमिकल त्यात वापरले जात नाही. त्यामुळे येथील पेढा हा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे, असे तेथील नागरिक सांगतात.

advertisement

पूर्णानगर येथील पेढा व्यावसायिक अभिजित तिवारी यांच्याशी लोकल 18 ने चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, या गावात 25 ते 26 वर्षापासून हा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. शेतीमध्ये उत्पन्न कमी होत असल्याने शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागत होतो. त्यामुळे शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन आणि त्याच माध्यमातून हा पेढ्याचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. तेव्हा शितल बोबडे यांनी सर्वात पहिले हा व्यवसाय सुर केला. त्यानंतर गावातील अनेक तरुणांनी हा व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले. आता पूर्णानगर बस स्टॉपला पेढ्यांचे 15 ते 16 दुकान आहेत. गावाच्या शेजारी असलेल्या गावातून येथे दूध पुरवल्या जाते. 70 ते 75 रुपये लिटर याप्रमाणे आम्ही दूध खरेदी करतो. प्रत्येक दुकानात वेगवेगळे गवळी दूध आणून देतात. त्यापासून हा पेढा बनवला जातो, असे ते सांगतात.

advertisement

बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, पुण्यातील श्वेता यांचे लोणचे दुबईमध्ये एक्स्पोर्ट, होतीय बक्कळ कमाई

पेढ्याचे वैशिष्ट्य काय? 

पुढे ते सांगतात की, पूर्णानगर येथील पेढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त दूध आणि साखर वापरून हा पेढा बनवला जातो. यात कोणतेही केमिकल किंवा इतर पदार्थ वापरले जात नाही. साखरेचे प्रमाण सुद्धा खूप कमी आहे. 1 लिटर दूध असेल तर 75 ग्राम साखर वापरली जाते.

advertisement

पेढा बनवण्याची प्रक्रिया काय? 

मोठमोठ्या कढाई मध्ये 20 लिटर दूध तापवून घेतात. त्यानंतर 3 तास आटवून घेतात. परफेक्ट पेढा बनवण्यासाठी दूध 3 तास चुलीवर ठेवावे लागते. त्यानंतर प्रमाणात साखर टाकली जाते. ती सुद्धा व्यवस्थित विरघळून झाल्यानंतर काही वेळ चुलीवरच ठेवण्यात येते. त्यानंतर 1 तास थंड झाल्यानंतर पेढा तयार केला जातो.

advertisement

मेळघाट मधील पर्यटकांमुळे पेढ्याचा व्यवसाय आणखी वाढीस लागला. पूर्णानगर हे गाव अमरावती परतवाडा रोडवर असल्याने मेळघाट जाणारे पर्यटक येथे थांबतात आणि पेढ्यांची खरेदी करतात. एकदा घेतलेला व्यक्ती परत येतोच ही आमच्या पूर्णा नगरच्या पेढ्याची खासियत आहे, असे त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
26 वर्षांची परंपरा, महाराष्ट्रातलं असं हे पेढ्यांचं गाव, हा पेढा लवकर होत नाही खराब, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल