पुणे : पुणे शहरात अनेक जुने व्यवसाय पाहिला मिळतात. घरगुती खानावळ पद्धतीने सुरु झालेला पुण्यातील सदाशिव पेठेतील पूना बोर्डिंग हाऊसचा प्रवास शंभराव्या वर्षात पोहचला आहे. याठिकाणी जेवणासाठी चक्क रांगा लागलेल्या असतात.
पुण्यात टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयात पुण्याबाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना घरगुती जेवणाची सोय व्हावी यासाठी 1925 साली याची सुरुवात कर्नाटकहून पुण्यात आलेले मणीअप्पा उडपीकर यांनी केली. घरगुती पद्धतीने रुचकर जेवण हे याठिकाणी तयार केलं जातं. यामध्ये एक उसळ, आळूची भाजी, बिरड्याची उसळ, फळभाजी, कोशिंबीर, पोळ्या, भात, पापड दही असं घरगुती पद्धतीने तयार केलेली थाळी दिली जाते.
advertisement
कोल्हापुरी ते घाटी मसाला, डोंबिवलीत खरेदी करा वेगवेगळे प्रकार, किंमतही स्वस्त
पाटावरील पंगत पासून सुरु झालेला प्रवास आज टेबल खुर्ची पर्यत येऊन पोहचला परंतु इथे मिळणाऱ्या जेवणाच आस्वाद घेण्यासाठी आज ही खवय्यांची रांग पाहिला मिळते. अगदी तासान तास लोक इथे उभे राहतात. एकत्र कुटुंब पद्धत संपत चालल्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करणं वेगवेगळे पदार्थ तयार करणे यासाठी कोणाकडे एवढा वेळ ही नाही त्यामुळे लोक इथे आवर्जून येत असतात. वर्षानु वर्षे अनेक नागरिक या जेवणाचा आस्वाद घेत असून, तब्येतीलाही यामुळे कोणताही अपाय होत नसल्याचे देखील उडपीकर सांगतात.
एका वेळाला 50 लोक बसण्याची सुविधा आहे. अनेक दिग्गज कलाकार, उद्योजक, राजकारण्यांनी येथील भोजनाचा आस्वाद घेतला आहेस. 1965 च्या युद्धावेळी खडकीतील कारखान्यांमध्ये कामगारांसाठी सायकलवरून जेवणाचे डबे दिले आहेत, असं उडपीकर सांगतात.
सध्या तिसऱ्या पिढीतील सुहास उडपीकर हे व्यवसाय सांभाळत आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे शहरांतील पेठांमध्ये गल्लोगल्ली खाणावळी, भोजनालये सुरू झाली. मात्र, शंभर वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना घरगुती जेवणाचा आनंद देणाऱ्या पूना बोर्डिंग हाउसची 'क्रेझ' आजही कायम आहे, असं सुहास उडपीकर सांगतात.