TRENDING:

Spicy Curry Recipe : आज घरी भाजीला काय बनवायचं? ट्राय करा 'अस्सल गावरान झणझणीत कांद्याचे मुठे'! पाहा रेसिपी

Last Updated:

Zanzanit Kandyache Muthe Recipe In Marathi : आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक भन्नाट रेसिपी घेऊन आलो आहोत. जी अगदी सगळ्यांना आवडेल. आज आपण पाहणार आहोत, कांद्याच्या पतीची भाजी. ही भाजी अतिशय वेगळी आणि चविष्ट आहे. बनवण्याची पद्धतही सोपीच आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : घरी रोज भाजी कशाची करावी हा प्रश्न अगदी प्रत्येकाला पडणारा आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता आपण अनेक रेसिपी पाहतो. त्या करायलाही घेतो. पण सगळ्याच रेसिपी चांगल्या बनतात असं नाही. काही रेसिपी फसतातही. पण आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक भन्नाट रेसिपी घेऊन आलो आहोत. जी अगदी सगळ्यांना आवडेल.
झणझणीत कंद्याचे मुठे कसे बनवायचे?
झणझणीत कंद्याचे मुठे कसे बनवायचे?
advertisement

आज आपण पाहणार आहोत, कांद्याच्या पतीची भाजी. ही भाजी अतिशय वेगळी आणि चविष्ट आहे. बनवण्याची पद्धतही सोपीच आहे. इंस्टाग्रामवर gharoghariannapurnaofficial या अकांऊटवर ही रेसिपी शेअर केली गेली आहे. एकदा ही झणझणीत भाजी बनवून पहा. तुम्हाला याची चाबव नक्कीच आवडेल.

कांद्याचे मुठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- कांद्याची पात

- खोबरं

advertisement

- कांदा

- आलं लसूण

- जिरे

- कोथिंबीर

- बेसन पीठ

- तेल

- तिखट

- मीठ

- हळद

- पाणी

कांद्याचे मुठे बनवण्याची कृती

- हिरवी कांद्याची पाट बारीक चिरून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधे आलं, लसूण, जिरे आणि थोडं पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घ्या.

advertisement

- यानंतर रात्रभर भिजवलेली तुरीची डाळ घ्या. त्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट, कोथिंबीर आणि कांद्याची पात घाला. नंतर यामध्ये बेसन पीठ, चवीनुसार मीठ, तिखट, हळद घालून घट्टसर मिश्रण तयार होईल.

- हाताने वळवून वरील मिश्रणाचे मुठे बनवा आणि ते 15 मिनिटांसाठी वाफवून घ्या.

- त्यानंतर गॅसवर खोबऱ्याचा मोठा तुकडा, 2 माध्यम आकाराचे कांदे भाजून घ्या. भाजलेल्या खोबऱ्यामध्ये वेलची, दालचिनी टाकून बारीक पेस्ट तयार करा.

advertisement

- नंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेला कांडा घ्या. त्यामध्ये कोथिंबीर टाकून तेही बारीक वाटून घ्या.

- आता एका कढईमध्ये तेल घाला. तेल अराम झाल्यावर त्यामध्ये कांद्याची पेस्ट, लसणाची पेस्ट घालून खाडे परतून घ्या. नंतर यामध्ये हळद, तिखट, धणेपूड आणि सोबतच खोबऱ्याचं वाटणही घाला.

- गावरान चव देण्यासाठी कला मसाला आणि आणि गरम घाला. नंतर चवीनुसार मीठ घालून परत थोडावेळ परतून घ्या.

advertisement

- आता यामध्ये पाणी, वाफवलेले मुठे आणि वरून थोडी कोथिंबीर घालून उकळी येईस्तोवर शिजवून घ्या.

अशा प्रकारे तुमचे झणझणीत आणि मस्तपैकी तर्री असलेले मुठे तयार आहेत. चपाती, भाकरी किंवा भातासोबतही ही भाजी खूप छान लागेल. ही गावरान रेसिपी घरी एकदा ट्राय करून पाहा. तुम्हाला नक्की आवडेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जालन्याच्या शेतकऱ्यानं घेतलं पैशाचं पीक! एका एकरात 10 लाखांची कमाई, काय केलं? Vi
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Spicy Curry Recipe : आज घरी भाजीला काय बनवायचं? ट्राय करा 'अस्सल गावरान झणझणीत कांद्याचे मुठे'! पाहा रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल