आज आपण पालकाची भाजी एका वेगळ्या स्टाईलनं बनवणार आहोत. ही रेसिपी sanjanas_kitchen78 या अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला तर मग पाहूया युनिक आणि टेस्टी पालक पनीरची भाजी कशी बनवायची.
युनिक पालक पनीर भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- तेल
- दालचिनी
- काळी मिरी
- लवंग
- वेलची
- कांदा
advertisement
- आलं लसूण पेस्ट
- टोमॅटो प्युरी
- मीठ
- हळद
- धणेपूड
- दही
- गरम मसाला
- कसुरी मेथी
- पालक
- पनीर
- बेसन
- ओवा
- काळी मिरी पावडर
- लाल तिखट
- सब्जी मसाला
युनिक पालक पनीर भाजी बनवण्याची पद्धत..
- ही भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण ग्रेव्ही तयार करून घेऊ.
- एका कढईमधे तेल घ्या आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, लवंग, वेलची असे खडे मसाले टाका.
- त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून चांगले परता.
- नंतर आलं लसूण पेस्ट घाला आणि कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या.
- त्यानंतर काश्मिरी लाल तिखट टाका.
- आता यामध्ये टोमॅटो प्युरी टाका आणि व्यवस्थित शिवाजवून घ्या.
- नंतर यामध्ये मीठ, हळद, धणेपूड टाकून शिजवा.
- भाजीला क्रिमी टेक्शचर येण्यासाठी थोडं दही टाका.
- नंतर जेव्हा भाजीचे तेल वेगळे होऊ लागेल तेव्हा त्यामध्ये गरम पाणी टाका.
- वरून गरम मसाला आणि कसुरी मेथी टाकून परत शिजवा.
- दुसरीकडे पालक बारीक चिरून घ्या आणि त्यामध्ये मीठ टाका.
- पालक प्लेटमध्ये काढून त्यातील जास्तीचे पाणी पिळून काढून घ्या.
- आता या चिरलेल्या पालकामध्ये ओवा, थोडंसं मीठ, काळी मिरी पावडर, लाल तिखट, हळद, कोणताही सब्जी मसाला टाका.
- आता यामध्ये तेल आणि बेसन टाकून मऊसूत कणिक बनवून घ्या.
- हा कणकेचा गोळा बटर पेपरवर पसरवून त्यावर पनीर किसून टाका.
- नंतर ते फोल्ड करून त्याच्या कडा दाबून घ्या.
- आता हे स्टीमरमध्ये वाफवून घ्या.
- स्टीम झाल्यानंतर याचे अर्ध्या अर्ध्या इंचाचे तुकडे करा आणि ते उकळत्या ग्रेव्हीमध्ये टाका.
- आता झाकून 2 मिनिटांसाठी शिजवा आणि तुमची युनिक पालक पनीरची भाजी तयार आहे.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
