TRENDING:

Alani Bhat Recipe : चिकन-मटणालाही लाजवेल, असा व्हेजिटेरियन अळणी भात! हेल्थ आणि टेस्टचे परफेक्ट मिक्स

Last Updated:

Alani Bhat Recipe In Marathi : तुम्ही कधी व्हेजिटेरियन अळणी भात खाल्लाय का? ही रेसिपी अत्यंत वेगळी, हेल्दी आणि खूप टेस्टी आहे. अळणी भात हा कोणताही भाजीच्या स्टॉकमध्ये म्हणजेच भाज्यांच्या पाण्यामध्ये बनवला जातो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : चिकन किंवा मटणाचा अळणी भात तुम्ही बऱ्याचदा खाल्ला असेल, पण तुम्ही कधी व्हेजिटेरियन अळणी भात खाल्लाय का? ही रेसिपी अत्यंत वेगळी, हेल्दी आणि खूप टेस्टी आहे. अळणी भात हा कोणताही भाजीच्या स्टॉकमध्ये म्हणजेच भाज्यांच्या पाण्यामध्ये बनवला जातो. चिकन किंवा मटणाच्या स्टॉकमध्ये बनवलेला आळणी भात खूप लोकप्रिय आहे.
व्हेजिटेरियन अळणी भात बनवण्याची सोपी पद्धत..
व्हेजिटेरियन अळणी भात बनवण्याची सोपी पद्धत..
advertisement

आज आम्ही तुम्हाला व्हेजिटेरियन अळणी भाताची रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी brown_chef_india या इंस्टाग्राम चॅनलवर शेअर केली गेली आहे. हा भातही बनवायला अगदी सोपा आहे. फक्त हा बनवण्यासाठी तुम्हाला आदल्या रात्री थोडी तयारी करावी लागू शकते. चला तर मग पाहूया व्हेजिटेरियन अळणी भात बनवण्याची सोपी रेसिपी.

व्हेजिटेरियन अळणी भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य..

advertisement

- कांदे

- हिरव्या मिरच्या

- आलं

- लसूण

- कोथिंबीर

- कुळीथ

- वांगे

- मोठ

- मीठ

- काळी मिरी

- तमालपत्र

- दालचिनी

- वेलची

- जावित्री

व्हेजिटेरियन अळणी भात बनवण्याची सोपी पद्धत..

- सर्वात आधी कांदे, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर हे सर्व मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्या.

advertisement

- आता कुकरमध्ये तेल टाकून गरम करा.

- या तेलामध्ये काळी मिरी, तमालपत्र, दालचिनी, वेलची आणि जावित्री हे सर्व मसाले टाका.

- आता यामध्ये वाटलेलं मिश्रण टाकून व्यवस्थित परतून घ्या.

- मसाला परतला गेल्यानंतर त्यामध्ये दोन वांगी चिरून टाका.

- यानंतर त्यामध्ये रात्रभर भिजवलेल्या कुळीथ आणि मोठ या दोन डाळी टाका.

advertisement

- त्यानंतर यामध्ये मीठ आणि पाणी टाकून कमीत कमी 8-9 शिट्ट्या घ्या.

- डाळी शिजल्यानंतर त्यातून डाळी आणि आणि स्टॉक वेगळा करा.

- आता परत एकदा आगासवर कुकर ठेवा.

- त्यामध्ये तेल टाकून ते गरम करा. तेल गरम झाल्यावर चिरलेला कांदा टाका.

- हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि थोडीशी हळद टाका.

advertisement

- आता यामध्ये स्टॉक आणि थोडं पाणी टाका.

- त्यामध्ये यामध्ये कोणतेही नवे तांदूळ किंवा जे तांदूळ चिकट बनतील ते टाका.

- यानंतर 4 शिट्ट्या घेतल्या की तुमचा अळणी भात तयार होईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Alani Bhat Recipe : चिकन-मटणालाही लाजवेल, असा व्हेजिटेरियन अळणी भात! हेल्थ आणि टेस्टचे परफेक्ट मिक्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल