TRENDING:

चेहऱ्यावर तेज देणारी हळद रोखू शकते हार्ट अटॅकपण! वाचा न ऐकलेले फायदे

Last Updated:

हिवाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांपासून हृदयरोगांपर्यंत विविध आजारांवर हळद गुणकारी असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आशिष त्यागी, प्रतिनिधी
इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात हार्ट अटॅकची शक्यता अधिक असते.
इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात हार्ट अटॅकची शक्यता अधिक असते.
advertisement

बागपत, 13 डिसेंबर : स्वयंपाकात कमी पडली, तर अन्न बेचव लागतं. जरा जास्त पडली, तर अन्न कडवट लागतं. त्यामुळे अन्नपदार्थांमध्ये अतिशय विचारपूर्वक आणि चवीनुसार घातली जाणारी हळद म्हणजे स्वयंपाकघरातला एक महत्त्वाचा घटक. हळदीमुळे त्वचेवर तेज येतं, हे आपल्याला माहितच असेल. परंतु हळद मोठमोठ्या आजारांवरदेखील फायदेशीर ठरते, हे तुम्हाला माहितीये का?

advertisement

हिवाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांपासून हृदयरोगांपर्यंत विविध आजारांवर हळद गुणकारी असते. डॉ. सुनीता सोनल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आहारात दररोज हळदीचा समावेश असेल, तर श्वसनासंबंधित आजार दूर होण्यास मदत मिळते. इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात हार्ट अटॅकची शक्यता अधिक असते. हळदीच्या नियमित सेवनामुळे रक्त पातळ राहतं. परिणामी हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो. शिवाय आपल्यापासून कर्करोगदेखील दूर राहतो. तसंच हळदीमुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहिल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी हळदीचं नियमित सेवन फायदेशीर ठरतं.

advertisement

'या' भाज्या थंडीत सर्वोत्तम! हार्ट राहील उत्तम, आजार राहतील दूर

हळद अँटिसेप्टिक असते. त्यामुळे जखम झाल्यावर आपण त्या जागी लगेच हळद लावतो. हळदीचं दूध प्यायल्यास जुन्या जखमाही भरून निघतात. तिच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळेच त्वचेवरील सूज आणि डाग हळूहळू बरे होतात. आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर हळद लावण्याचा सल्ला दिला जातो.

पपईची पानं खास, पेशींची करू नका चिंता, रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल!

advertisement

गरम पाण्यात वाटलेली हळद आणि मध मिसळून दररोज प्यायल्यास पोट साफ होतं आणि शरिरातले सर्व टाकाऊ पदार्थ मूत्रावाटे, शौचावाटे बाहेर पडतात. तर दररोज झोपण्यापूर्वी हळदीचं दूध प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
चेहऱ्यावर तेज देणारी हळद रोखू शकते हार्ट अटॅकपण! वाचा न ऐकलेले फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल