पपईची पानं खास, पेशींची करू नका चिंता, रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल!

Last Updated:

पपईच्या झाडात अँटीऑक्सिडंट चांगल्या प्रमाणात असतं. ज्यामुळे निरोगी राहायला मदत मिळते.

मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पोटदुखीवरही पपईची पानं रामबाण असतात.
मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पोटदुखीवरही पपईची पानं रामबाण असतात.
आशिष त्यागी, प्रतिनिधी
बागपत, 12 डिसेंबर : उन्हाळा आला की शरिरात गारवा निर्माण करतील अशी अनेक थंड फळं बाजारात उपलब्ध असतात. परंतु आपण मात्र वर्षभर शरिरात उब निर्माण झाली तरी चालेल पण पपई अगदी आवडीने खातो. तुम्हाला माहितीये का, पपई केवळ चवीला स्वादिष्ट नसते, तर तिचे शरिराला फायदेही अनेक आहेत.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात शरिराला विविध आजार जडतात. अगदी लहान मुलांमध्येसुद्धा मधुमेहाचा त्रास दिसून येतो. अवेळी जेवण आणि अपूर्ण झोप ही यामागील कारणं आहेत. म्हणूनच वेळ मिळेल तसा व्यायाम करणं आणि जमेल तसा सकस आहार घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो. पपई आरोग्यासाठी जशी फायदेशीर आहे, तशी तिची पानंही गुणकारी असतात.
advertisement
पपईच्या पानांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रक्तातल्या पेशी वाढण्यासही मदत मिळते. शिवाय या पानांचा वापर विविध आजारांवर उपचार करण्यासाठीदेखील केला जातो. डेंग्यूसारखा भयानक ताप बरा करण्यासाठी ही पानं फायदेशीर ठरतात. तसंच या पानांमुळे पचनक्रियादेखील सुरळीत राहते.
advertisement
डॉ. राघवेंद्र चौधरी सांगतात, 'नियमितपणे पपईच्या पानांचं सेवन केल्यास व्यक्ती ऊर्जावान राहते. तापासह इतर आजारांपासून व्यक्तीचं संरक्षण होतं. कारण पपईच्या झाडात अँटीऑक्सिडंट चांगल्या प्रमाणात असतं. ज्यामुळे निरोगी राहायला मदत मिळते. महत्त्वाचं म्हणजे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पोटदुखीवरही पपईची पानं रामबाण असतात. महिलांनी ग्लासभर पाण्यात पपईची पानं, चिंच आणि मीठ मिसळून बनवलेला काढा प्यावा. यामुळे पोटदुखीवर झटक्यात आराम मिळतो', असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
पपईची पानं खास, पेशींची करू नका चिंता, रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल!
Next Article
advertisement
Dharashiv News: तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळल्या!
तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु
  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

View All
advertisement