शरीराला प्रोटीनसाठी काय खावं? कोणत्या पदार्थांनी होईल फायदा पाहा PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
निरोगी राहण्यासाठी आपण दररोज आपल्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे.
advertisement
शरीराची वाढ आणि तंदुरुस्ती राखण्यासाठी प्रथिने अत्यंत महत्त्वाची असतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, आपली सर्व दैनंदिन कामे करण्यासाठी प्रोटीनची गरज असते. सामान्यतः लोक मांसाहाराला प्रोटीनसाठी चांगले मानतात, यात खरच तथ्य आहे का? याची माहिती पुण्यातल्या डॉक्टर प्रणिता अशोक यांनी दिली आहे.
advertisement
advertisement
प्रोटीन पावडर किंवा वे प्रोटीनची गरज प्रत्येकाला नसतं. रोज दोन-दोन तास व्यायाम करणाऱ्यांना जास्त एनर्जी लागते. त्यावेळी त्यांना प्रोटीनची गरज जास्त लागते. त्यांनीच हे पावडर घ्यावं. रोज साधारण व्यायाम तसंच तासभर चालणं किंवा दहा मिनिटं जॉगिंग करणाऱ्यांना प्रोटीन डोसची गरज नसते. रोजच्या आहारातून जी प्रोटीन मिळतात तीच पुरेशी असतात.
advertisement
advertisement