माइंडफुल मेडिटेशनचा सराव : रोज थोडा वेळ माइंडफुलनेसचा सराव केल्याने तुम्ही शांत, केंद्रित आणि कमी चिंतेत राहता. वर्तमानावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्ही तुमच्या विचारांवर आणि भावनांवर अधिक चांगले नियंत्रण ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला जड आणि अस्वस्थ वाटेल, तेव्हा थांबा आणि दीर्घ श्वास घ्या. यामुळे तुमचे मन शांत होईल.
निसर्गाच्या सानिध्यात जा : निसर्गात वेळ घालवण्याचे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी मोठे फायदे आहेत. तुम्ही जवळच्या डोंगरावर ट्रेकिंगला जा किंवा तुमच्या घराशेजारी 10 मिनिटे फेरफटका मारा. ही एक सोपी सेल्फ-केअर पद्धत तुम्हाला शांत आणि सकारात्मक ठेवण्यास मदत करेल. यामुळे तुमचे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती सुधारते.
advertisement
नियमित व्यायामाने तंदुरुस्त रहा : नियमित व्यायाम, योगा, स्विमिंग किंवा जलद चालणे यामुळे शरीरात 'एंडोर्फिन' नावाचे नैसर्गिक मूड बूस्टर हार्मोन वाढते. शारीरिक हालचालींमुळे आनंदाची भावना वाढते आणि मेंदू तीक्ष्ण होतो. फक्त 10 ते 15 मिनिटांच्या व्यायामानेही 'फील-गुड' हार्मोन्स बाहेर पडतात.
स्क्रीन टाइममधून ब्रेक घ्या : आपल्या दैनंदिन जीवनात इलेक्ट्रॉनिक उपकरणे अविभाज्य आहेत. पण संशोधनातून असे दिसले आहे की, जास्त स्क्रीनचा वापर केल्याने नैराश्यात वाढ होऊ शकते. जेव्हा आपण सोशल मीडिया, गेमिंग आणि टीव्ही पाहण्यात जास्त वेळ घालवतो, तेव्हा आपण निष्क्रिय होतो आणि वास्तवापासून दूर जातो.
विचार लिहून ठेवा : तुमचे विचार आणि भावना लिहून ठेवल्याने तुम्हाला स्वतःचे आत्मपरीक्षण करण्यास आणि भावनांना मोकळे करण्यास मदत होते. दररोज काही शब्द लिहिल्याने तुम्हाला ताण नियंत्रित करता येतो, विचारांना योग्य दिशा मिळते आणि भावनांवर प्रक्रिया होते. यामुळे आत्म-जागरूकता वाढते.
पुरेशा झोपेची सवय : मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप आवश्यक आहे. पुरेशी झोप मिळाल्याने मेंदूचे कार्य सुधारते, मूड चांगला होतो आणि चिडचिड कमी होते. यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशी ताजेतवाने आणि उत्साही राहता.