TRENDING:

Ganpati Decor: गणेशोत्सवसाठी करा हटके डेकोरेशन, ठाण्यात 30 रुपयांपासून फुलांच्या माळा, पाहा Location

Last Updated:

Ganpati Decoration: ठाण्यात गणेशोत्सवासाठी अगदी स्वस्तात सजावटीचं साहित्य मिळत आहे. फक्त 30 रुपयांपासून फुलांच्या माळा उपलब्ध आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून सजावटीच्या आकर्षक साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. ठाण्यातील पालिका बाजारमध्ये सजावटीचे साहित्य अगदी स्वस्तात मिळतंय. फायर ब्रिगेडजवळ आलंम फ्लॉवर्स हे दुकान आहे. इथं अवघ्या 30 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत फुलं, माळा, पानं आणि लाकडी बॅकराउंड्स मिळत आहेत. त्यामुळे खरेदीसाठी मोठी गर्दी होतेय.
advertisement

गणेशोत्सव जवळ आला की घराघरात डेकोरेशनची लगबग सुरु होते. झेंडूच्या माळा हा सजावटीचा अविभाज्य भाग असतो. ठाण्यातील होलसेल दुकानात भगव्या आणि पिवळ्या रंगांतील 4 फुटांची झेंडूची माळ फक्त 30 रुपयांना मिळते. याशिवाय कपड्यांपासून बनवलेल्या आकर्षक फुलांच्या माळाही येथे उपलब्ध आहेत. या माळांची एक जोडी 200 रुपयांना मिळते आणि त्या तीन वेगवेगळ्या रंगांत आहेत.

advertisement

Shopping: सणासुदीच्या काळात सोडू नका ही संधी, पारंपरिक आणि आधुनिक वस्तू ठाण्यात एका छताखाली, स्वस्तात करा खरेदी Video

जर तुम्हाला अधिक भव्य आणि उठावदार डेकोरेशन हवे असेल, तर स्पंजवर लावलेल्या फुलांच्या पट्ट्या उत्तम पर्याय आहेत. या पट्ट्यांचे दर 600 रुपयांपासून सुरू होतात आणि डिझाइननुसार 2000 रुपयांपर्यंत जातात. विशेष म्हणजे ग्राहकांच्या मागणीनुसार हे डेकोरेशन कस्टमाईज करूनही मिळते.

advertisement

फुलांचे बंचेस देखील येथे विक्रीसाठी ठेवले आहेत ज्यांची किंमत 150 रुपये आहे. तसेच ग्रीन लिफसाठी दर 30 रुपये ते 50 रुपये ठेवले आहेत. कमळाच्या (लोटस) फुलांना डेकोरेशनमध्ये खास स्थान असते. येथे मोठा लोटस 60 रुपयांना तर लहान लोटस 40 रुपयांना मिळतो. पारंपरिक सजावटीसाठी लाकडी जाळीचे बॅकराउंड इथे 350 रुपयांना उपलब्ध आहे. हे बॅकराउंड घरगुती मंडपात एक वेगळाच आकर्षक लुक देऊ शकते.

advertisement

एकंदरीत, आलम फ्लॉवर्स मध्ये गणपती डेकोरेशनसाठी लागणारे सर्व साहित्य योग्य दरात, भरपूर पर्यायांत आणि चांगल्या गुणवत्तेत उपलब्ध आहे. ग्राहकांना हवे तसे डिझाइन्स मिळवण्याची मुभा देखील इथे आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक सुंदर आणि लक्षवेधी करण्यासाठी हे दुकान एक उत्तम ठिकाण ठरत आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ganpati Decor: गणेशोत्सवसाठी करा हटके डेकोरेशन, ठाण्यात 30 रुपयांपासून फुलांच्या माळा, पाहा Location
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल