Shopping: सणासुदीच्या काळात सोडू नका ही संधी, पारंपरिक आणि आधुनिक वस्तू ठाण्यात एका छताखाली, स्वस्तात करा खरेदी Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
पारंपरिक आणि आधुनिक वस्तूंचा संगम येथे पाहायला मिळणार आहे. या वस्तूंची तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता.
ठाणे: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये मोरया एक्झिबिशन या बहुरंगी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या पारंपरिक आणि आधुनिक वस्तूंचा संगम येथे पाहायला मिळणार आहे. या वस्तूंची तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता.
या प्रदर्शनात हँडक्राफ्टेड वस्तूंपासून फॅशन, लाइफस्टाइल आणि गृहसजावटीच्या उत्पादनांपर्यंत अनेक प्रकारच्या आकर्षक वस्तू उपलब्ध आहेत. भेटवस्तू, कपडे, दागिने यांचा समावेश असून, खास महिलांसाठी विविध प्रकारच्या साड्यांची भरगच्च रेंज ठेवण्यात आली आहे. इरकल, कांजीवरम, कॉटन, ब्लॉक प्रिंट, डोला सिल्क आणि पैठणी अशा साड्यांचे प्रकार 1000 रुपयांपासून मिळणार आहेत, तर स्टिच (रेडी टू वेअर ) साड्याही आकर्षण ठरत आहेत. ड्रेस मटेरियलची किंमत 1200 ते 1500 रुपयांदरम्यान आहे.
advertisement
दागिन्यांमध्ये हँडमेड ज्वेलरी 250 ते 1200 रुपयांपर्यंत उपलब्ध असून, राखी गिफ्टिंगसाठी पैठणी थाळी (600 रुपये) स्वामींच्या पादुका (1100 रुपये), पंचधातूचे दिवे (1500 रुपये) यांसारखे पर्याय ग्राहकांसाठी ठेवण्यात आले आहेत. याशिवाय, खणाच्या आणि पैठणी टोप्या 350 रुपयांमध्ये, तर फ्रिज मॅग्नेट्स 80 रुपयांपासून उपलब्ध आहेत.
advertisement
परंपरेचा वारसा आणि आधुनिकतेचा स्पर्श यांचा सुरेख मिलाफ ठाणेकरांना या प्रदर्शनात अनुभवता येणार आहे. सणासुदीच्या खरेदीसाठी उत्तम ठिकाण ठरू शकणाऱ्या या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हे प्रदर्शन 3 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 02, 2025 3:28 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Shopping: सणासुदीच्या काळात सोडू नका ही संधी, पारंपरिक आणि आधुनिक वस्तू ठाण्यात एका छताखाली, स्वस्तात करा खरेदी Video