Raksha Bandhan 2025: लाडक्या बहिणींसाठी पोस्टाचं खास गिफ्ट, रक्षाबंधनला फक्त 12 रुपयांत पाठवा राखी!

Last Updated:

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनला भावाकडे जाणं शक्य नसल्याने पोस्टाच्या माध्यमातून राखी पाठवू शकता. फक्त 12 रुपयांत पोस्टाने खास राखी इन्व्हलप तयार केला आहे.

+
Raksha

Raksha Bandhan 2025: लाडक्या बहिणींसाठी पोस्टाचं खास गिफ्ट, रक्षाबंधनला फक्त इतक्या रुपयांत पाठवा राखी!

मुंबई – यंदा 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. भाऊ–बहिणींच्या प्रेमाचे आणि नात्याच्या घट्ट बंधाचे प्रतीक असलेला हा सण संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा होतो. याच दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची, सुरक्षिततेची प्रार्थना करते. मात्र, काही वेळा भाऊ किंवा बहीण दूर गावी असतात आणि सण एकत्र साजरा करणे शक्य होत नाही. सध्या डिजिटल युग असल्यामुळे ऑनलाईन शुभेच्छा पाठवून रक्षाबंधन साजरी केली जाते. पण यावर भारतीय डाक विभागाने उत्तम योजना राबवली आहे. डिजिटल युगात आता परगावी असलेल्या भावंडांना प्रत्यक्ष स्वरूपात राखी पाठवता येणार आहे.
भारतीय डाक विभाग दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधन विशेष लिफाफा (Raksha Bandhan Special Envelope) उपलब्ध करून देत आहे. फक्त 12 रुपयांमध्ये मिळणारा हा लिफाफा पूर्णपणे वॉटरप्रूफ असून, राखी सुरक्षितरीत्या पोहोचवण्यासाठी विशेषतः डिझाइन करण्यात आलेला आहे.
लिफाफ्याचे वैशिष्ट्य
1) वॉटरप्रूफ आणि टिकाऊ साहित्याचा वापर.
advertisement
2) राखी, छोटा संदेश किंवा शुभेच्छा कार्ड सुरक्षित ठेवण्याची सोय.
3) देशभरात कुठेही पाठवता येण्याची सुविधा.
4) सामान्य पोस्टच्या तुलनेत राखीसाठी योग्य आकार व जाडी.
5) तीन ते चार दिवसांत राखी पोहोचण्याची खात्री.
भारतीय पोस्टचे हे राखी एन्व्हलप देशातील सर्व प्रमुख डाक कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. राखी पाठवण्यासाठी वेगळे पार्सल करण्याची आवश्यकता नसून, या लिफाफामधूनच राखी सोप्या पद्धतीने आणि अत्यंत कमी खर्चात पाठवता येते.
advertisement
पोस्ट विभागाने नागरिकांना लवकर राखी पाठवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ती वेळेवर आणि सणाच्या दिवशी भावाच्या हातात पोहोचू शकेल. सध्या श्रावण महिना सुरू असून पोस्ट कार्यालयांमध्ये राखी पाठवण्यासाठी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Raksha Bandhan 2025: लाडक्या बहिणींसाठी पोस्टाचं खास गिफ्ट, रक्षाबंधनला फक्त 12 रुपयांत पाठवा राखी!
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement