Cancer : किचनमधील 'या' 3 गोष्टी कॅन्सरला निमंत्रण देत आहेत? तुम्हीही दररोज याच चुका करताय का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि अनेक आरोग्य तज्ज्ञांनी वेळोवेळी सावध केले आहे की, आपण ज्या भांड्यात जेवण बनवतो किंवा ज्या पद्धतीने पदार्थ साठवतो, त्याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. चला तर मग जाणून घेऊया, अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या बदलण्याची आज नितांत गरज आहे.
आपण आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची कितीही काळजी घेतली, तरी कधीकधी आपल्या नकळत आपल्याच किचनमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या आरोग्यासाठी 'स्लो पॉयझन' ठरतात. आजकाल कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. संशोधकांच्या मते, केवळ बाहेरील प्रदूषण किंवा व्यसनच नाही, तर आपल्या स्वयंपाकाघरातील काही सवयी आणि वस्तू देखील याला कारणीभूत ठरू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
धोका काय? जेव्हा ही भांडी जास्त गरम होतात किंवा त्यांचे कोटिंग निघू लागते, तेव्हा त्यातून PFOA (Perfluorooctanoic Acid) सारखी विषारी रसायने बाहेर पडतात. अनेक अभ्यासानुसार, या रसायनांचा संबंध किडनी आणि लिव्हरच्या कॅन्सरशी जोडला गेला आहे.जर तुमच्या नॉन-स्टिक भांड्यावर ओरखडे (Scratches) आले असतील, तर ते लगेच बदला. शक्य असल्यास लोखंडी (Cast Iron), स्टेनलेस स्टील किंवा मातीच्या भांड्यांचा वापर सुरू करा.
advertisement
2. प्लास्टिकचे डबे आणि मायक्रोवेव्हआपण फ्रिजमध्ये पदार्थ साठवण्यासाठी किंवा ऑफिसला डबा नेण्यासाठी सर्रास प्लास्टिकचा वापर करतो. विशेषतः गरम जेवण प्लास्टिकच्या डब्यात भरणे किंवा प्लास्टिकच्या भांड्यात अन्न मायक्रोवेव्हमध्ये गरम करणे ही सर्वात मोठी चूक आहे.प्लास्टिकमध्ये BPA (Bisphenol A) आणि Phthalates ही रसायने असतात. गरम अन्नाच्या संपर्कात आल्यावर ही रसायने अन्नात विरघळतात. यामुळे हार्मोन्सचे असंतुलन होऊन महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
advertisement
advertisement
3. रिफाईन्ड तेल आणि वारंवार गरम केलेले तेल अनेकांना सवय असते की, एकदा कढईत पदार्थ तळला की उरलेले तेल पुन्हा पुन्हा गरम करून वापरतात. विशेषतः पुरी किंवा भजी तळल्यानंतर उरलेले तेल आपण फेकून न देता पुन्हा वापरतो. तेल वारंवार कडक गरम केल्यामुळे त्यात 'फ्री रॅडिकल्स' तयार होतात आणि तेलाचे रूपांतर 'ट्रांस फॅट' मध्ये होते. हे तेल शरीरातील पेशींना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे पोटाचा आणि आतड्यांचा कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. तळलेले तेल पुन्हा वापरणे टाळा. जेवणासाठी घाण्याचे तेल (Cold Pressed Oil) वापरणे आरोग्यासाठी सर्वात उत्तम आहे.
advertisement









