मुंबईच्या लालबाग परिसरात असलेल्या दिगंबर आर्ट्स या दुकानात बाई पण भारी देवांमध्ये घातलेल्या कलाकारांनी साड्या आणि दागिन्यांनी गौरी सजवण्यात आली आहे. हा सिनेमा महिलावर्गामध्ये चांगलाच लोकप्रिय झाला होता. त्याचेच प्रतिबिंब गौरीच्या सजावटीमध्येही उमटलंय.
रेडिमेड मंडप आणि फॅन्सी सजावटीचे पडदे करा ‘इथं’ स्वस्तात खरेदी; बाप्पाची सजावट होईल हटके
advertisement
गौरीचे वेगवेगळे मुखवटे देखील या बाजारात उपलब्ध असून त्याची किंमत 300 रुपयांपासून सुरू आहे. अमरावती पॅटर्न, सोलापुरी पॅटर्न, कोल्हापुरी पॅटर्न, गजरा, आंबडा, असे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पीओपी, फायबर, कापडी, लाकडी गौरीचे शरीर देखील आहेत. गौरीसाठी लागणारे दागिने यामध्ये मंगळसूत्र, कानातले, ठुशी, पैजण, गजरा, नथ, कंबरपट्टा, अशी आभूषण देखील दोनशे रुपयांपासून या ठिकाणी उपलब्ध आहेत.
‘यंदा ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. बाई पण भारी देवा या चित्रपटातील कलाकारांनी घातलेल्या साडी, दागिने हे आम्ही गौरीसाठी उपलब्ध करून दिले असून ग्राहकांची याला मोठी पसंती मिळतीय. हा संपूर्ण सेट आठ हजार रुपयांपासून असून तुम्हाला हव्या त्या पद्धतीनं याच्या किंमतीमध्ये बदल होतो, अशी माहिती दिगंबर आर्ट्सचे मालक सागर कसाबे यांनी दिली.