ही माहेरवाशिणी असल्याने तिचं मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत केलं जातं. तिच्या आवडीचे पदार्थ करू तिला नैवेद्य दाखवला जातो. तसेच गौराईच्या पुजेनिमित्त रात्र जागवली जाते. महिलांसाठी हा खास सण. त्यामुळे एकमेकींना गौरी पूजनाच्या शुभेच्छा देणंही आलंच. अगदी पतीही आपल्या पत्नीला या शुभेच्छा देऊ शकतात.
advertisement
सोन्यामोत्यांच्या पावली
आली अंगणी गौराई
पंचपक्वान, झिम्मा-फुगडी,
पूजा-आरतीची घाई
अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया
घरा दारा लाभो सदा कृपेची छाया
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
-----------------------------------------------------------
आई गौराई गणाची, आली माझ्या गं अंगणी
संगे शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारी
झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल
आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल
गौरी पूजनाच्या मनापासून शुभेच्छा!
-----------------------------------------------------------
गवर गौरी ग गौरी ग,
झिम्मा फुगडी खेळू दे,
हिरव्या रानात रानात
गवर माझी नाचू दे
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिनी
गौराई तुमच्या घरात सुख, समृद्धी, आनंद
आणि भरभराट घेऊन येऊ दे ही सदिच्छा!
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!
-----------------------------------------------------------
आली माझ्या गं अंगणी गौराई,
लाभो तुम्हास सुख समृद्धी,
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
-----------------------------------------------------------
गौराई माते नमन करते तुला
अखंड सौभाग्य लाभू दे मला
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी माता
आपणां सर्वांच्या घरी, भरभराट,
निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य,
मुबलक धनधान्य तसेच व
विद्याभ्यासात सुयश घेऊन ये
आणि तिची कृपा दृष्टी निरंतर
आपणां सर्वांवर राहो.
-----------------------------------------------------------
आली आली गं गौराई,
माय माझी माहेराला
चला चला गं सयांनो,
ताट घेऊ पुजनाला
तिचं शिण काढूया गं,
तिला जेवू घालूया
तिला भरजरी पैठणीचं,
पदर देऊया
गौरी पूजेच्या शुभेच्छा!
-----------------------------------------------------------
काकणांसह पैजणांचा नाद कानी गुंजला
पार्वती-गौरी प्रकटली लेकरा भेटायला
घालुनी फुगड्या सयांनो
हिला मनोरंजीत करा
लाडकी कन्या जणू, माहेरच्या आली घरा
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गौरी गणपतीच्या आगमना,
सजली अवधी धरती,
सोनपावलाच्या रुपाने
ती येवो आपल्या घरी,
होवो आपली प्रगती,
लाभो आपणास सुख समृद्धी
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
-----------------------------------------------------------
सणासुदीची घेऊन उधळण
आला हा हसरा भाद्रपद
सौभाग्यवती पुजती गौरीगणपती
खेळ खेळुनी पारंपरिक थोर!
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
-----------------------------------------------------------
भाद्रपदामध्ये पसरली हिरवळ
सुंदर दिसे निसर्गाची किमया
गौराईच खेळायची आहे ना
मग आँनलाईन जमुयात सर्व सख्या!
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!