घरगुती तूप त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तुपामुळे त्वचा निरोगी राहते आणि ग्लो कायम राहतो. यातली जीवनसत्त्वं आणि हेल्दी फॅट्समुळे शरीराला ऊर्जा मिळते, शिवाय पचन, त्वचा आणि हाडं मजबूत करण्यासाठीही तूप उपयुक्त आहे.
Morning Habits : चांगल्या प्रकृतीसाठी चांगल्या सवयी, फिट तब्येतीसाठी हेल्थ टिप्स
त्वचेसाठी घरचं तूप कसं उपयुक्त आहे पाहूयात -
advertisement
ऋतू बदलताना त्वचा खूप कोरडी होते. घरचं साजूक तूप मॉइश्चरायझर म्हणून काम करतं. चेहऱ्यावर तूप लावल्यानं सुरकुत्या येणं, उन्हामुळे होणारी जळजळ यासारख्या अनेक समस्या दूर होतात आणि त्यामुळे त्वचा तरुण दिसते. तूप खाल्ल्यानं त्वचेला आतून मॉइश्चरायझेशन मिळतं, त्वचा मऊ राहते.
घरगुती तुपाचा फेस पॅक बनवायचा ते समजून घेऊया. घरगुती तुपाचा फेस पॅक घरी बनवता येतो. एका भांड्यात एक चमचा तूप, एक चमचा बेसन आणि चिमूटभर हळद एकत्र करा. चांगलं मिसळून घ्या. चेहऱ्याला लावा. हा तूप फेसपॅक पंधरा - वीस मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर कोमट पाण्यानं धुवा.
Diabetes : तिशीपासून मीठ, साखर खाणं कमी करणं का गरजेचं ? आयुर्वेदात आहे उत्तर
घरगुती साजूक तूप डोळ्यांखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठीही उपयुक्त आहे. यासाठी, डोळ्यांभोवती तुपानं हलक्या हातानं मसाज करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी असं मालिश करा.
मृत त्वचा काढून टाकण्यासाठी तुपापासून फेस स्क्रब देखील बनवू शकता. यासाठी, एक चमचा तूप आणि एक चमचा साखर मिसळून स्क्रब तयार करा. हा स्क्रब ओठांना लावल्यानं कोरडेपणा कमी होतो आणि ओठ चमकदार आणि मऊ होतात.
