advertisement

Morning Habits : सकाळच्या सवयींवर अवलंबून आहे तुमचं आयुष्य, सवयी बदला, आयुष्य सावरा

Last Updated:

ताण संप्ररेक वाढल्यामुळे या काळात हृदयविकाराचा धोका जास्त असतो. काही वाईट सवयींमुळे, हृदयावरचा दबाव आणखी वाढू शकतो. सकाळच्या कोणत्या सवयी तुमचं आयुष्य कमी करतायत आणि त्या का सुधारल्या पाहिजेत ते समजून घेऊयात.

News18
News18
मुंबई : तुमचा दिवस कसा सुरु होतो यावर पुढचा दिवस अवलंबून असतो. सकाळचे सुरुवातीचे तास कसे आहेत हृदयाच्या आरोग्यावर खोलवर परिणाम करतात. सकाळी रक्तदाब आणि कॉर्टिसोलसारखे ताण संप्रेरक नैसर्गिकरित्या वाढतात. त्या काळात, तुम्ही शरीराला काय काय देता यावर दिवसभराची शरीराला लागणारी ऊर्जा अवलंबून असते.
ताण संप्ररेक वाढल्यामुळे या काळात हृदयविकाराचा धोका जास्त असतो. काही वाईट सवयींमुळे, हृदयावरचा दबाव आणखी वाढू शकतो. सकाळच्या कोणत्या सवयी तुमचं आयुष्य कमी करतायत आणि त्या का सुधारल्या पाहिजेत ते समजून घेऊयात.
advertisement
सकाळी उठल्यानंतर लगेच पाणी न पिणं - रात्रीच्या झोपेनंतर शरीर थोडंसं डिहायड्रेटेड असतं. सकाळी उठल्यानंतर पाणी न प्यायल्यानं रक्त जाड होऊ शकतं, ज्यामुळे हृदयाला जास्त काम करावं लागतं.
थेट चहा किंवा कॉफी प्यायल्यानं हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. म्हणून, सकाळी उठून सर्वात आधी पाणी पिणं चांगलं जेणेकरून शरीराला आराम मिळेल.
advertisement
वॉर्म अप न करता जोरदार व्यायाम सुरू करणं - सकाळचा व्यायाम फायदेशीर आहे, पण लगेचच जोरदार व्यायाम सुरू करणं धोकादायक असू शकतं. झोपेनंतर रक्तवाहिन्या थोड्या कडक होतात, त्यामुळे अचानक व्यायाम करणं हृदयासाठी धोकादायक असू शकतं. हलकं स्ट्रेचिंग करण्यानं किंवा चालण्यानं सुरुवात करणं प्रकृतीसाठी अधिक सुरक्षित आहे.
सकाळी रक्तदाब न तपासणं - उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर म्हटलं जातं. सकाळी रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. सकाळच्या नियमित रक्तदाब तपासणीमुळे हृदयरोगाची लक्षणं लवकर ओळखता येतात.
advertisement
मीठयुक्त नाश्ता खाणं - लोणचं, प्रक्रिया केलेले ब्रेड किंवा तयार स्नॅक्स यासारखे मीठ जास्त असलेल्या स्नॅक्समुळे रक्तदाब वाढू शकतो. सकाळी जास्त सोडियम खाल्ल्यानं हृदयावर अतिरिक्त ताण येतो. फळं, ओट्स किंवा कडधान्यासारखे हलके, संतुलित पर्याय चांगले असतात.
अंथरुणावर असतानाच मोबाईल किंवा ईमेल तपासणं - सकाळी लवकर कामाचे ईमेल किंवा सोशल मीडिया पाहण्यानं ताण वाढू शकतो. यामुळे कॉर्टिसोल आणि रक्तदाब बराच काळ वाढू शकतो. दिवसाची शांत सुरुवात हृदयासाठी अधिक फायदेशीर मानली जाते.
advertisement
नाश्ता वगळणं - नाश्ता न केल्यानं शरीरात ताण वाढू शकतो आणि हार्मोनल असंतुलन वाढू शकतं. नियमितपणे नाश्ता न केल्यानं, हृदयरोगाचा धोका जास्त असल्याचं फ्रंटियरसिन या रिसर्च वेबसाइटमधे प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार आढळून आलं आहे. सकाळी संतुलित आहार घेणं हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रक्तातील साखरेसाठी महत्वाचं आहे. शरीराला ऊर्जा मिळावी यासाठी जागं झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर नाश्ता करावा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Morning Habits : सकाळच्या सवयींवर अवलंबून आहे तुमचं आयुष्य, सवयी बदला, आयुष्य सावरा
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement